मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम शिवांगी जोशी जगते अलिशान आयुष्य, पाहा PHOTO

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम शिवांगी जोशी जगते अलिशान आयुष्य, पाहा PHOTO

 आजकाल सोशल मीडियाच्या माध्यमातून(Social Media) कलाकार(Artist) चाहत्यांना (Fan) आपल्या आयुष्यात घडणाऱ्या अनेक गोष्टींबद्दल माहिती देत असतात.

आजकाल सोशल मीडियाच्या माध्यमातून(Social Media) कलाकार(Artist) चाहत्यांना (Fan) आपल्या आयुष्यात घडणाऱ्या अनेक गोष्टींबद्दल माहिती देत असतात.

आजकाल सोशल मीडियाच्या माध्यमातून(Social Media) कलाकार(Artist) चाहत्यांना (Fan) आपल्या आयुष्यात घडणाऱ्या अनेक गोष्टींबद्दल माहिती देत असतात.

  मुंबई, 18 मे-  आपल्या आवडत्या कलाकाराबाबतची प्रत्येक लहान लहान  गोष्ट माहिती असावी अशी चाहत्यांची इच्छा असते. आजकाल सोशल मीडियाच्या माध्यमातून(Social Media) कलाकार(Artist) चाहत्यांना (Fan) आपल्या आयुष्यात घडणाऱ्या अनेक गोष्टींबद्दल माहिती देत असतात. त्यांचे वाढदिवस,त्याचे सेलीब्रेशन,नवीन खरेदी,नवीन प्रोजेक्ट,नवीन घर,नवीन नात्याची सुरुवात अगदी सगळं ते या सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांपर्यंत पोहोचवत असतात. आपल्या सुख-दुःखाच्या गोष्टी चाहत्यांशी शेअर करत असतात. यामुळे चाहत्यांनाही आपल्या आवडत्या कलाकाराच्या आयुष्यात काय चाललं आहे याची माहिती असते.

  टाईम्स नाऊ न्यूज डॉट कॉमनं दिलेल्या वृत्तानुसार,आज सोशल मीडियावर(Social Media)चर्चा आहे ती टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्री शिवांगी जोशीची (Shivangi Joshi). शिवांगी आज आपला 26 वा वाढदिवस(Birth Day)साजरा करत आहे. 2016 पासून सुरू असलेल्या‘ये रिश्ता क्या कहलाता है’या मालिकेतून ती रसिकांचे मनोरंजन करत आहे.तिनी साकारलेलीनायरा सिंघानियाची भूमिका खूपच लोकप्रिय आहे. ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेसह बेगुसराय आणि खेलती है जिंदगी आंख मिचौली या मालिकांमध्येही तिनं काम केलं आहे.

  आपल्या सौंदर्यानं आणि अभिनयानं लाखो चाहत्यांना भुरळ घालणाऱ्या शिवांगीची लाईफस्टाईलही (Lifestyle) अतिशय उत्तम आहे. सोशल मीडियावरही अतिशय सक्रीय असलेली ही अभिनेत्री आपल्या चाहत्यांसाठी सतत आपले फोटो,व्हिडिओ शेअर करत असते. त्याला चाहत्यांचा नेहमीच उदंड आणि उस्फूर्त प्रतिसाद मिळत असतो.

  (हे वाचा:PHOTOS: 'स्पिलीट्सविला 12' फेम आराधना शर्माची 'तारक मेहता'मध्ये धमाकेदार एन्ट्री)

  अतिशय सुंदर असलेल्या शिवांगीचे सोशल मीडियावर तब्बल 40 लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स असून,तिचे फोटो,व्हिडिओ व्हायरल नेहमीच व्हायरल होत असतात. अवघ्या 26 वर्षांची शिवांगी अतिशय लक्झुरियस आयुष्य जगते. अत्यंत अलिशान कार्स,डेहराडूनसारख्या(Dehradun)नितांत सुंदर शहरातील अलिशान घराची ती मालकीण आहे. आपल्या अलिशान घरातील अनेक फोटो ती शेअर करत असते. या फोटोवरून तिच्या घराच्या सौंदर्याची आणि अलिशानपणाची कल्पना येते. तिच्या या घराला मोठी बाग असून,आजूबाजूचा परिसरही हिरवाईनं(Greenery)नटलेला आहे. इथं वेळ घालवायला शिवांगीला खूप आवडतं. वारंवार ती तिथं जात असते आणि तिथले सुंदर फोटो,व्हिदिओ शेअर करत असते. तिचं हे घर अतिशय कलात्मक रीतीनं सजवलेलं असून सुंदर कोच,असंख्य प्रकारची इनडोअर झाडं इथं आहेत. या सजावटीतून शिवांगीच्या अभिजात सौंदर्यदृष्टीचीही कल्पना येते. या घरातील अतिशय सकारात्मक वातावरण सगळा ताण दूर करून मन प्रसन्न करतं. फोटो बघूनही याचा अनुभव येतो.

  (हे वाचा:Happy Birthday: आधी पेंटर, मग सिंगर आणि आता अभिनेता; वाचा अली जफरचा प्रवास)

  जग्वारची मालकीण-

  दोन वर्षापूर्वी 2019मध्ये शिवांगीनं अलिशान जग्वार कारची(Jaguar Car)खरेदी केली असून,तिच्या उंची जीवनशैलीत यामुळं आणखीनच भर पडली आहे. या कारचे फोटो,व्हििडओ तिनं शेअर केले होते. आमच्या कुटुंबातील नवीन सदस्य अशी ओळख करून देत तिनं आपल्या राजेशाही कारची बातमी चाहत्यांना दिली होती.

  First published:

  Tags: Entertainment, Tv actress