'स्प्लीट्सविला 12' फेम आराधना शर्माने नुकताच 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मध्ये एन्ट्री घेतली आहे. गेली 12 वर्षे तारक मेहता... हा कार्यक्रम सब टीव्हीवर अखंडित सुरु आहे. यामधील दयाबेन, जेठालाल, टप्पू, बबिता, अय्यर अशी प्रत्येक पात्र फेमस आहेत. आत्ता यात आराधनाची एन्ट्री झाली आहे. यामध्ये आराधना एका डीटेक्टीव्ह च्या भूमिकेत असणार आहे. स्प्लीट्सला 12 मुळे आराधना चांगलीच चर्चेत आली होती. यामध्ये तिची एक बोल्ड स्पर्धक अशी ओळख होती. तारक मेहता...मध्ये सध्या औषधांच्या काळाबाजारवर लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे. यामध्ये आराधना गुंडांच्या टोळीत सामील होऊन जासूसी करताना दिसत आहे. आराधना आपल्या बोल्ड आणि हॉट अंदाजामुळे नेहमीच चर्चेत असते. ती सोशल मीडियावर सुद्धा मोठ्या प्रमाणात सक्रीय असते. आराधनाला आत्ता या नव्या अंदाजात पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.