मुंबई, 27 मे: अभिनेता 'अक्षय कुमार'चा (Akshay Kumar) आगामी पृथ्वीराज सिनेमाची सध्या जोरदार चर्चा आहे. 3 जूनला सिनेमा प्रदर्शित होणार आहे. प्रदर्शनाला काही दिवस शिल्लक राहिलेले असताना सिनेमाचं नाव बदलण्यात आलं आहे. पृथ्वीराज सिनेमाचं नाव बदलून आता 'सम्राट पृथ्वीराज' (samrat prithviraj ) असं करण्यात आलं आहे. याविषयी निर्माते यशराज फिल्मने प्रसिद्धीपत्रक जारी करत सविस्तर माहिती दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून सिनेमाच्या शिर्षकारुन वाद निर्माण झाला होता. सम्राज पृथ्वीराज चौहान यांची कारकिर्द पाहता त्यांना सन्मान देण्यात यावा त्यामुळे सिनेमाचे नाव हे सम्राट पृथ्वीराज असे असावे अशी मागणी करणी सेना यांच्याकडून करण्यात आली होती. यावर निर्मात्यांनी विचार करुन सिनेमाचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला.
यशराज फिल्मनी परिपत्रकात म्हटलेय, 'सिनेमाच्या शिर्षकावरुन झालेली चूक दाखवून दिल्याबद्दल आम्ही आभारी आहोत. पृथ्वीराज सिनेमातून कोणाचा अनादर आणि भावना दुखावण्याचा आमचा होतू नव्हता. तसेच स्वर्गीय महान सम्राज पृथ्वीराज यांचाही अनादर करण्याचा आमचाही कोणताच हेतू नाही. सिनेमाच्या माध्यमातून सम्राज पृथ्वीराज यांच्या शौर्याची, कर्तृत्वाची आणि देशाच्या इतिहासात त्यांचे असलेले योगदान सर्वांसमोर मांडण्याचा आमचा हेतू आहे'.
हेही वाचा - PHOTO: मे महिन्यात मराठी कलाकारांनी केली फुल टू धम्माल, याठिकाणी घेतला व्हेकेशनचा आनंद
प्रसिद्धीपत्रकात पुढे म्हटलेय, 'श्री राजपूत करणी सेना आणि त्यांच्या सदस्यांनी पृथ्वीराज सिनेमाच्या शिर्षकावरुन आक्षेप घेतला होता. त्यांच्याशी आम्ही शांततेत बोललो. त्यांनी आमची चूक आम्हाला समजून सांगितली. त्यांना आम्ही संपूर्ण फिल्म दाखवली. त्यांनी सिनेमाविषयी कोणताही आक्षेप नाही. आम्ही 'पृथ्वीराज' सिनेमाचे नाव बदलून 'सम्राट पृथ्वीराज' करत आहोत. तसेच करणी सेनेचे आम्ही आभारी आहोत की त्यांनी आमची बाजू ऐकून घेतली'.
दैनिक भास्करने दिलेल्या वृत्तानुसार, आधी पृथ्वीराजच्या निर्मात्यांनी सिनेमाचे नाव बदलणार नाही असे सांगितले होते. आम्ही सिनेमातून पृथ्वीराज यांचा संपूर्ण इतिहास मांडण्याचा प्रयत्न केला आहे. जितकं शक्य आहे तितका इतिहास सिनेमातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे', असे त्यांनी म्हटले होते.
आता 3 जूनला पृथ्वीराज हा सिनेमा सम्राट पृथ्वीराज या नव्या नावाने प्रदर्शित होणार आहे. सिनेमात अक्षय कुमार सम्राट पृथ्वीराज यांच्या भूमिकेत आहे तर अभिनेत्री मानुषी छिल्लर हिने सम्राट पृथ्वीराज यांची पत्नी आणि महाराणी संयोगित यांची भूमिका साकारली आहे. सिनेमात अक्षय मानुषी यांच्यासोबतच संजय दत्त, सोनू सूद, साक्षी तंवर, आशुतोष राणा, ललित तिवारी आणि मानव विज हे कलाकारही मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हिंदी, तमिळ आणि तेलुगू या तिन्ही भाषेत सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Bollywood actor, Bollywood actress, Bollywood News