मुंबई, 3 फेब्रुवारी : बॉलिवुड अभिनेता (Bollywood actor) संजय दत्तनं (Sanjay Dutt) पत्नी मान्यता (Sanjay dutt wife) हिला डिसेंबर महिन्यात मुंबईच्या उच्चभ्रू लोकवस्तीतले आलिशान चार फ्लॅट भेट दिले. याची किंमत ऐकून तुम्ही थक्क व्हाल. जवळपास 100 कोटींच्या घरात या चार फ्लॅट्सची (flats) किंमत होती. पण विशेष म्हणजे संजय दत्तच्या बायकोने ही भेट त्याला परतही केली लगेच. मुंबईच्या बांद्रा (Bandra, pali hill) भागात हे फ्लॅट्स (flat) आहेत.
पत्नी मान्यता हिनं एका आठवड्यातच ही भेट घ्यायला नकार देत परत केली. मनीकंट्रोलला मिळालेल्या कागदपत्रांवरून हे फ्लॅटचा व्यवहार स्पष्ट होतात. भेटीच्या लेखी करारपत्रानुसार 26.5 कोटी हा सर्कल रेट आहे. किंवा याला सरकारनं ठरवलेली या चार मालमत्तांसाठी किंमतही म्हणता येईल. मात्र ब्रोकर्सच्या मते या मालमत्तांची खरी किंमत 100 कोटीहून जास्त आहे.
हे चार फ्लॅट्स पाली हिल्सच्या (Pali hills) इंपिरियल हाईट्स (Imperial heights) बिल्डिंगमध्ये आहेत. ही बिल्डिंग अतिशय श्रीमंत आणि उच्चभ्रू (elite) लोकांची म्हणून ओळखली जाते. संजय दत्तने घेतलेल्या फ्लॅट्सपैकी दोन फ्लॅट्स हे अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर आहेत. याशिवाय अकराव्या आणि बाराव्या मजल्यावर दोन पेंटहाऊस आहेत. या गिफ्टची नोंदणी कागदपत्रं Zapkey.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. हे संकेतस्थळ जाहीररीत्या उपलब्ध असलेल्या मालमत्तांची एकूण किंमत मोजत त्याबाबतच्या माहितीचं व्यवस्थापन करतं.
याबाबत संजय दत्त यांच्या प्रतिनिधीशी संपर्क साधला असता त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला. moneycontrol कडे भेटींची दोन लेखी करारपत्रं उपलब्ध आहेत. एक म्हणजे संजय दत्तनं आपल्या पत्नीसाठी बनवलेलं. आणि दुसरं मान्यता, जी संजय दत्तची पत्नी आहे, तिनं दिलनशीन या नावानं संजय दत्तला परत केलेल्या भेटीचं करारपत्र(gift deed). विविध माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, मान्यता हिचं मूळ नाव दिलनशीन आहे.
पाहिलं लेखी करारपत्र संजय दत्त यानं 23 डिसेंबर 2020 रोजी केलेलं आहे. मान्यतानं हे फ्लॅट्स 29 डिसेंबर 2020 रोजी संजयला परत केले आहेत असं कागदपत्रं सांगतात. प्रत्येकी 500 रुपये देऊन ही करारपत्रं केली गेली होती.
या मालमत्तांचा आकार प्रत्येकी 3000 स्क्वेअर फीट इतका आहे. या मालमत्तांचं व्यवहार मूल्य 90 ते 95 हजार रुपये इतकं असल्याचं ब्रोकर्स सांगतात. या एका अपार्टमेंट्सचं मासिक भाडं तब्बल 5 ते 7 लाख रुपये आहे. ही बिल्डिंग एका उंच टेकडीवर असून तिथून शहराचं सुंदर दृश्य दिसत असल्याचं ब्रोकर्स सांगतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood News, Sanjay dutt, Wife