जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / ज्या कोरोना लॉकडाऊनला कंटाळले लोक त्याचा अभिनेत्री यामी गौतमला झाला फायदा; शेअर केला अनुभव

ज्या कोरोना लॉकडाऊनला कंटाळले लोक त्याचा अभिनेत्री यामी गौतमला झाला फायदा; शेअर केला अनुभव

ज्या कोरोना लॉकडाऊनला कंटाळले लोक त्याचा अभिनेत्री यामी गौतमला झाला फायदा; शेअर केला अनुभव

अभिनेत्री यामी गौतमी (Yami gautam) याआधी जे कधीच करू शकली नाही, ते तिला कोरोना लॉकडाऊनमध्ये करायला जमलं. yami-gautam-gets-freedom-from-neck-injury-in-corona-era-shares-experience-

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 24 ऑगस्ट :   कोरोना लॉकडाऊनचा (corona lockdown) अनेकांना फटका बसतो आहे, अनेक जण लॉकडाऊनमुळे कंटाळले आहेत. मात्र अभिनेत्री यामी गौतमला (Yami gautam) मात्र या लॉकडाऊनचा फायदा झाला आहे. जे याआधी कधीच शक्य झालं नाही ते यामी गौतमीने लॉकडाऊनमध्ये केलं आहे. मानेला गंभीर दुखापत झाल्याने कित्येक दिवसांपासून होत असलेल्या वेदनांपासून यामीला मुक्ती मिळाली आहे. योगा करून तिनं या वेदनांवर मात केली आहे. कोरोना लॉकडाऊनमध्ये अनेक सेलिब्रिटींनी आपल्या फिटनेसचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले. जीम बंद होत्या त्यावेळी बहुतेक सेलिब्रिटींना घरच्या घरी व्यायाम, योगा करून स्वत:ला फिट ठेण्याचा प्रयत्न केला. अभिनेत्री यामी मानेच्या वेदनांनी त्रस्त होती. त्यामुळे तिला नियमित योगा करणं कधीच शक्य झालं नाही. मात्र लॉकडाऊनमध्ये प्रयत्न करून तिला आता योगा करणं शक्य झालं आहे आणि योगा करून तिने मानेच्या वेदनांपासूनही आराम मिळवला आहे. तिने आपल्या इन्स्टाग्रामवर आपला अनुभव मांडला आहे.

जाहिरात

यामीने सांगितलं, मानेला गंभीर दुखापत झाल्याने तिला कोणतंही काम करताना खूप काळजी घ्यावी लागत होती. डान्स, कसरत, प्रवास किंवा कोणतीही शारीरिक कार्य करताना तिला सावध राहावं लागत होतं. एका कलाकारासाठी कामात प्रत्येक वेळी आपल्या वेदनांचं कारण देणं अशक्य होतं. त्यामुळे कामावेळी वेदना सहन कराव्या लागत होत्या. हे वाचा -  अभिनेत्री आथिया शेट्टीने शेअर केला बोल्ड फोटो; क्रिकेटर केएल राहुल म्हणाला… यामी म्हणाली, “लॉकडाऊनमध्ये मला असं काही करण्यासाठी वेळ मिळाला जे मी याआधी करू शकले नाही. प्रत्येक वेळी जेव्हा मी योगाभ्यास करण्याचा प्रयत्न करायचे तेव्हा माझ्या मानेत खूप वेदना व्हायच्या आणि मग मी योगा करणं सोडून द्यायचे. वेदनांमुळे नियमित योगा करण्यासाठी मी कधीच प्रोत्साहीत झाले नाही. मात्र आता मी योगा करण्याचा मार्ग शोधला आणि स्वत:च्या शरीराला निरोगी ठेवण्यासाठी प्रयत्न केला. माझ्या प्रयत्नांमुळे असा परिणाम पाहायला मिळाला जो याआधी कधीच मिळाला नव्हता” “हा लॉकडाऊन फिट दिसण्यासाठी किंवा दिवसाच्या व्यायामाबाबत नव्हता. ही ती वेळ होती जेव्हा मी स्वत:ला ऐकलं आणि माझ्या धुंदीच्या प्रवाहात चालत राहिली. मी कोणती तज्ज्ञ नाही, ते तुम्हालाही या फोटोत दिसून येईल. मी माझं पहिलं पाऊल योगा यात्रेकडे टाकलं आहे, जे आता थांबणार नाही”, असं यामी म्हणाली. हे वाचा -  सोनू सूदने केली मदत, आता पुण्याची वॉरिअर आजी देतेय स्वसंरक्षणाचे धडे; पाहा VIDEO यामी शेवटची बाला फिल्ममध्ये दिसली. आता तिची पुढील फिल्म ‘गिनी वेड्स सनी’ लवकरच नेटफ्लिक्स रिलीज होणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात