Home /News /entertainment /

सोनू सूदने केली मदत, आता पुण्याची वॉरिअर आजी देतेय स्वसंरक्षणाचे धडे; पाहा VIDEO

सोनू सूदने केली मदत, आता पुण्याची वॉरिअर आजी देतेय स्वसंरक्षणाचे धडे; पाहा VIDEO

रस्त्यावर कौशल्य दाखवून आपलं पोट भरण्याचा प्रयत्न करणाऱ्या या आजींचा व्हिडीओ सोनू सूदने (sonu sood) सोशल मीडियावर पाहिला आणि तिला मदतीचं आश्वासन दिलं जे त्याने पूर्ण केलं आहे.

  पुणे, 23 ऑगस्ट : काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या रस्त्यावर लाठीकाठीचं आपलं कौशल्य दाखवणाऱ्या वॉरिअर आजीचा (warrior aaji) व्हिडीओ तुम्हाला आठवतो आहे का? हो त्याच आजी ज्या कोरोना लॉकडाऊनमध्ये आपलं आणि आपल्या कुटुंबाचं पोट भरण्यासाठी रस्त्यावर उतरून कसरत दाखवत होत्या. आता या आजी सोनू सूदच्या मदतीमुळे स्वसंरक्षणाचे धडे देत आहेत. सोनू सूदने त्यांच्यासाठी मार्शिअल आर्ट स्कूल सुरू करून दिलं आहे. या आजी पुण्यातील हडपसर याठिकाणच्या असून त्यांचे नाव शांताबाई पवार आहे. लहानपणापासून डोंबारी खेळ करणाऱ्या आजी या वयातही खेळ करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी मदत मागत असल्याचा त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाला. प्रसिद्ध नेमबाज असणाऱ्या आजी चंद्रो तोमर (ज्यांच्यावर सांड की आँख हा सिनेमा बनला आहे) यांनी देखील या 'वॉरिअर आजीं'चा व्हिडीओ शेअर केला होता. तो व्हिडीओ रिट्वीट करत सोनूने या आजींना मदत करण्याची इच्छा व्यक्त केली होती. या महिलेसाठी आपल्याला मार्शिअल आर्ट्स स्कूल सुरू करायचं असल्याचं सांगत त्याने तिची पूर्ण माहिती मागितली होती आणि सोनूने आपलं आश्वासन पूर्ण केलं आहे, त्याने या आजींना मदत केली आहे. गणेश चतुर्थीच्या निमित्ताने सोनू सूदने त्यांच्यासाठी मार्शिअल आर्ट्स स्कूल सुरू करून दिलं आहे.
  मानव मंगलानीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे, "गणेश चतुर्थीच्या निमित्ताने सोनू सूदने वॉरिअर आजी शांता पवार यांच्यासाठी मार्शिअल आर्ट्स स्कूल खोलून दिलं आहे, ज्यांचा व्हिडीओ इंटनरेवर व्हायरल झाला होता. मजुरांच्या देवदूताने या आजींसाठी स्कूल सुरू करून दिलं जेणेकरून त्या महिला आणि लहान मुलांना स्वसंरक्षणाचे धडे देईल" हे वाचा - 2 महिने सुशांत न दिसल्याने कशी झालीये त्याच्या डॉगीची अवस्था; VIDEO VIRAL विशेष म्हणजे या आजींनी दोन सिनेमामध्येही काम केलं आहे. मात्र परिस्थितीने पुन्हा त्यांना रस्त्यावर खेळ करायला भाग पाडलं.  लॉकडाऊनमध्ये त्यांची आणि कुटुंबाची झालेली परवड थांबवण्यासाठी त्या स्वत: पैसे कमावण्यासाठी बाहेर पडल्या.  मुली-नातवंडांसह 18 जणांचं कुटुंब त्या सांभाळण्याचा प्रयत्न करत आहेत. रस्त्यावर आपल्या कसरती दाखवल्यानंतर सोनू सूदच्या मदतीमुळे त्यांनी मार्शिअल आर्ट्स स्कूलमध्ये स्वसंरक्षणाचे धडे द्यायला सुरुवात केली आहे. हे वाचा - 'या' VIDEO मध्ये चिमुकल्याची कमाल तर पाहा, तुम्हीही म्हणाल... व्वा छोटे उस्ताद! या आजींनी सोनू सूदचे आभारही मानले आहेत आणि आपल्या स्कूलचं नाव त्यांनी सोनू सूद मार्शिअल आर्ट्स स्कूल ठेवलं आहे.
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Sonu Sood

  पुढील बातम्या