जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / VIDEO:अभिनेता संदीप पाठकला उघडायचंय चहाचं दुकानं अन् विकायच्या आहेत 'या' वस्तू

VIDEO:अभिनेता संदीप पाठकला उघडायचंय चहाचं दुकानं अन् विकायच्या आहेत 'या' वस्तू

VIDEO:अभिनेता संदीप पाठकला उघडायचंय चहाचं दुकानं अन् विकायच्या आहेत 'या' वस्तू

VIDEO:अभिनेता संदीप पाठकला उघडायचंय चहाचं दुकानं अन् विकायच्या आहेत 'या' वस्तू

सर्वांना हसवणारा अभिनेता संदीप पाठकला ( Sandeep Pathak Video) अचानक चहाचं दुकान उघडण्याची इच्छा झाली आहे. त्यानं तसा व्हिडीओ शेअर केला आहे. पाहा काय म्हणतोय तुमचा लाडका अभिनेता.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 17 जून: नाटक असो सिनेमा असो किंवा कॉमेडी सगळ्यात आपली छाप उमटवणार हरहुन्नरी अभिनेता म्हणजे संदीप पाठक ( Sandeep Pathak) प्रामाणिकपणे काम करुन अभिनयाच्या जोरावर संदीपनं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. संदीपची फॅन फॉलोविंगही प्रचंड आहे. संदीप सोशल मीडियावरही चांगलाच सक्रीय असतो. मागील अनेक वर्ष खडतर मेहनत घेऊन संदीप आज यशाच्या शिखरावर पोहोचला आहे. यश मिळूनही संदीपला नव नवीन गोष्टी करण्याचा छंद आहे. सतत काही तरी नवीन करण्याच्या तयारी असणाऱ्या संदीपला आता एक चहाचं दुकान खोलायचं आहे. संदीपनं स्वत: एक व्हिडीओ शेअर करत त्याला चहाचं दुकान खोलायचं आहे असं सांगितलं आहे. त्याचप्रमाणे दुकानात त्याला आणखी काय काय वस्तू विकायच्या आहेत हे देखील त्यांनी सांगितलं आहे. संदीपनं एक व्हिडीओ शेअर केलाय ज्यात तो एका चहाच्या दुकानात उभा आहे. तिथे उभा राहून तो म्हणतोय, ‘अपुनभी एक चाय का दुकान खोलेगा. चाय बिस्कूट, लेमन, सोडा, राईस प्लेट सब बेचेगा’. संदीपचा हा व्हिडीओ पाहून त्यांच्या चाहत्यांनी हसून प्रतिक्रिया दिल्यात. हेही वाचा - अखेर नेहाच्या पहिल्या नवऱ्याची मालिकेत एंट्री, ‘हा’ अभिनेता साकारणार अविनाशची भूमिका संदीप सोशल मीडियावर सक्रीय असल्यानं तो सतत लिप्सिंग व्हिडीओ करत असतो. यावेळीही त्यानं हा लिप्सिंग व्हिडीओ शूट केलाय जो त्याच्या चाहत्यांना प्रचंड आवडला आहे.

जाहिरात

अभिनेता संदीप सध्या ‘वाय’ ( Y the Film) या मराठी सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. दरम्यान त्यानं सिनेमाचं प्रमोशन करण्यासाठीच हा व्हिडीओ शूट केलाय. व्हिडीओमध्ये संदीपनं वाय सिनेमाचं टी- शर्टही घातला आहे.  संदीपच्या व्हिडीओवर अभिनेत्री मुक्ता बर्वेनं ( Mukta Barve) कमेंट करत ‘चाय नाही रे वाय’ असं म्हटलं. यावरुन एकच लक्षात येत आहे की दोघांनी सिनेमाचं प्रमोशन करण्यासाठी हा घाट घातला आहे. अभिनेत्री मुक्ता बर्वे वाय सिनेमात मुख्य भूमिकेत असून एका शासकीय अधिकाऱ्याची भूमिका ती साकारणार आहे. त्याचप्रमाणे सिनेमात संदीप पाठकही महत्त्वाच्या भूमिकेत आहे. मुक्ता आणि संदीपसह सिनेमात प्राजक्ता माळी ( Prajakta Mali)  नंदू माधव, ओमकार गोवर्धन, रसिका चव्हाण, सुहास शिरसाट, संदीप पाठक अशा नामवंत कलाकारांसोबत रोहित कोकाटे, संदीप दंडवते, प्रदीप भोसले आदी कलाकारही आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात