मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /चोरीचा आरोप झाल्यानंतर दिग्दर्शकाने केली कंगनाची पाठराखण! वाचा काय आहे प्रकरण

चोरीचा आरोप झाल्यानंतर दिग्दर्शकाने केली कंगनाची पाठराखण! वाचा काय आहे प्रकरण

अभिनेत्री कंगना रणौतने (Kangana Ranut) नुकतंच तिच्या मणिकर्णिका रिटर्न्स (Manikarnika Returns) या सिनेमाची घोषणा केली आहे. दरम्यान या सिनेमाशी संबंधित तिच्यावर चोरीचा आरोप झाला आहे

अभिनेत्री कंगना रणौतने (Kangana Ranut) नुकतंच तिच्या मणिकर्णिका रिटर्न्स (Manikarnika Returns) या सिनेमाची घोषणा केली आहे. दरम्यान या सिनेमाशी संबंधित तिच्यावर चोरीचा आरोप झाला आहे

अभिनेत्री कंगना रणौतने (Kangana Ranut) नुकतंच तिच्या मणिकर्णिका रिटर्न्स (Manikarnika Returns) या सिनेमाची घोषणा केली आहे. दरम्यान या सिनेमाशी संबंधित तिच्यावर चोरीचा आरोप झाला आहे

मुंबई, 16 जानेवारी : अभिनेत्री कंगना रणौतने (Kangana Ranut) नुकतंच तिच्या मणिकर्णिका रिटर्न्स (Manikarnika Returns) या सिनेमाची घोषणा केली आहे. कंगनाने तिच्या ट्विटर हँडलवरून मणिकर्णिका रिटर्न्स : द लेजेंड ऑफ दिद्दा' (Manikarnika Returns: The Legend of Didda) या सिनेमाची माहिती दिली असून यात ती काश्मीर ची राणी दिद्दाची भूमिका साकारणार असल्याचं सांगितलं होत. पण मणिकर्णिका रिटर्न्सच्या या घोषणेनंतर काहीच दिवसात कंगनावर थेट चोरीचे गंभीर आरोप करण्यात आले.

दिद्दा: द वॉरिअर ऑफ काश्मीर (Didd: The Warrior of Kashmir) या पुस्तकाचे लेखक आशिष कौल (Ashish Kaul) यांनी अभिनेत्री कंगना रणौतवर चोरीचा आरोप केला आहे. आशिष यांच्या म्हणण्यानुसार अभिनेत्री कंगना रणौतने तिचा सिनेमा मणिकर्णिका रिटर्न्स : द लेजेंड ऑफ दिद्दा' (Manikarnika Returns: The Legend of Didda) या सिनेमासाठी कंगनाने आशिषच्या दिद्दा: द वॉरिअर ऑफ काश्मीर या पुस्तकातून कथा चोरी केली आहे.

(हे वाचा- मराठमोळ्या अभिनेत्याचा बॉलिवूडमध्ये बोलबाला, काजोलसोबत साकारली भूमिका

दरम्यान यावर या सिनेमाचे दिग्दर्शक कमल जैन (Kamal Jain)  सांगतात, सण 1950 पूर्वीच्या ऐतिहासिक कथांना कॉपीराइटची आवश्यकता नसते. 'मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झाँसी' या सिनेमासाठी तेव्हा आम्ही कुठले हक्क विकत घेतले नव्हते,  कारण राणी लक्ष्मीबाईंची कथा 1950 पूर्वीची होती पण तेच धोनीच्या बायोपिकवर (M.S. Dhoni: The Untold Story) अधिकार घ्यावे लागले कारण ही आजच्या युगाची कहाणी आहे.

त्याचप्रमाणे मणिकर्णिका रिटर्न्स : द लेजेंड ऑफ दिद्दा' (Manikarnika Returns: The Legend of Didda) हा एक हाय बजेट सिनेमा असून याचं बजेट  80 कोटींहून अधिक असणार असल्याचं दिग्दर्शक कमल जैन यांनी सांगितलं. सिनेमाच्या लेखनाबद्दल बोलायचं झाल्यास 'दिद्दा'च्या कथेचं लेखन दोन उत्कृष्ट लेखक करत असून आम्ही लवकरच त्यांची नाव जाहीर करू, असं दिग्दर्शक कमल जैन म्हणाले. दैनिक भास्करला दिलेल्या मुलाखतीदरम्यान ते बोलत होते.

(हे वाचा- OMG! प्राची देसाईच्या पायाला गंभीर दुखापत; विमानतळावर अशा अवस्थेत दिसली अभिनेत्री, VIDEO VIRAL

आशिष कौल यांनी कंगना रणौत यांच्यावर कॉपीराइटचा आरोप केला आहे. एका मुलाखती दरम्यान ते म्हणाले की, स्वतः च्या हक्कांसाठी संघर्ष करणारी कंगना माझ्यासारख्या लेखकाच्या हक्कांचं उघडपणे उल्लंघन करत आहे. लेखक कौल पुढे म्हणाले की, कंगनाने कॉपीराइट कायद्याचं उल्लंघन केलं असून हे बेकायदेशीर आहे. तिने देशातील आयपीआर आणि कॉपीराइट कायद्याचं पूर्णपणे उल्लंघन केलं आहे.

First published:

Tags: Bollywood, Bollywood actress, Jammu and kashmir, Kangana ranaut