मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /मराठमोळ्या अभिनेत्याचा बॉलिवूडमध्ये बोलबाला, काजोलसोबत साकारली भूमिका

मराठमोळ्या अभिनेत्याचा बॉलिवूडमध्ये बोलबाला, काजोलसोबत साकारली भूमिका

बहुचर्चित मराठमोळा अभिनेता वैभव तत्ववादी (Vaibhav Tatwawaadi)  पुन्हा एकदा हिंदी सिनेमातून मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. या सिनेमात तो अभिनेत्री काजोलसोबत (Kajol) दिसणार असून, त्याने काजोलबरोबर काम करण्याचा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे.

पुढे वाचा ...

मुंबई, 16 जानेवारी : मराठमोळा अभिनेता वैभव तत्ववादीने (Vaibhav Tatwawaadi)  या पूर्वीही  'बाजीराव-मस्तानी (Bajirao Mastani) आणि 'मणिकर्णिकाः द क्वीन ऑफ झांसी' (Manikarnika: The Queen Of Jhansi) सारख्या सुपरहिट हिंदी सिनेमामध्ये भूमिका साकारली होती. आता वैभवने थेट अभिनेत्री काजोल (Kajol) बरोबर महत्वाची भूमिका साकारली आहे. त्रिभंगाः टेढी मेढी क्रेजी (Tribhanga - Tedhi Medhi Cazy) या सिनेमातून  वैभव मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. त्रिभंगा हा सिनेमा नुकताच नेटफ्लिक्स (Netflix) या OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला असून यातील वैभवची विशेष भूमिका चर्चेचा विषय ठरत आहे.

नुकतंच, न्यूज 18 इंडियाला दिलेल्या मुलाखती वैभवने त्याचा अभिनेत्री काजोल आणि अभिनेत्री रेणुका शहाणे (Renuka Shahane) यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव शेअर केला. अभिनेत्री काजोल आणि रेणुका शहानेंबरोबर काम करण्याचा अनुभव  खूप सुंदर होता. कोणत्या कलाकाराला, कोणती भूमिका साजेशी आहे याचं विशेष ज्ञान रेणुका शहानेंना आहे असं वैभव सांगतो.

एक अभिनेता म्हणून, जेव्हा एखादा मोठा अभिनेता तुमच्यावर विश्वास ठेवतो तेव्हा ती सगळ्यात सुंदर भावना असते. तसंच या सिनेमात कंवलजीत सिंह (Kanwaljit Singh), तन्वी आझमी (Tanvi Aazmi) सारख्या दिग्दजांनबरोबर काम करण्याची संधी मिळाल्याने वैभव स्वतःला नशिबावन समजतो.

महिला दिग्दर्शकाबरोबर केलेल्या कामाबद्दल विचारलं असता वैभव सांगतो, 'मी तीन चित्रपटांमध्ये महिला दिग्दर्शकांसोबत काम केलं आहे (मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी, लिपस्टिक अंडर माय बुरखा आणि त्रिभंगाः तेरी मेधी क्रेझी) (Manikarnika, Lipstick Under My Burkha, Tribhanga). मी कधीही दिग्दर्शकाला पुरुष किंवा महिला या चष्म्यातून बघत नाही. माझ्यासाठी दिग्दर्शक म्हणजे अशी व्यक्ती ज्याच्याकडे विशेष कौशल्य आहे. दिग्दर्शन हे पुरुष किंवा स्त्रियांबद्दल नाही, तर त्या विशेष कौशल्याबद्दल आहे. सिनेमाचं दिग्दर्शन महिला करत आहे, की पुरुष यापेक्षा दिग्दर्शन करणाऱ्या व्यक्तीकडे काय विशेष कौशल्य आहे हे जाणून घेणं महत्वाचं असत.

त्रिभंगा हा सिनेमा काजोल, तन्वी आझमी आणि मिथिला पालकर यांच्याभोवती फिरणारी तीन पिढ्यांच्या आई-मुलीची ती कहाणी आहे. यातील वैभव तत्ववादी त्याच्या उत्तम अभिनयामुळे चर्चेत आहे.

First published:
top videos

    Tags: Bollywood, Netflix, OTT