मुंबई, 16 जानेवारी: बॉलिवूड अभिनेत्री (Bollywood actress) प्राची देसाई (Prachi Desai) गेल्या काही काळापासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे. पण ती सोशल मीडियावर कायम अॅक्टिव्ह असते. प्राची देसाईचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल (Viral video) होताना दिसत आहे. यामध्ये ही अभिनेत्री एका व्हीलचेअरवर (Wheelchair) बसलेली पाहायला मिळत आहे. मुंबई विमानतळावर पोहचण्यासाठी प्राचीने व्हीलचेअरचा वापर केला आहे. प्राची देसाईला अशा अवस्थेत पाहून चाहत्यांना धक्का बसला आहे.
प्राची देसाईच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने तिला व्हीलचेअरवरून यावं लागलं आहे. पायाला इतकी वेदना तिच्या चेहऱ्यावरील हास्य लोकांची मनं जिंकत आहे. प्राची देसाईचा हा व्हिडिओ विरल भयानीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'प्राचीने आम्हाला तिच्या दुखापतीचं कारण सांगितलं नाही. ती या अवस्थेत सुद्धा खुपच सुंदर दिसत आहे.' प्राचीची ही अवस्था पाहून तिच्या चाहत्यांना खूप चिंता होत आहे.
View this post on Instagram
प्राची गेल्या बऱ्याच काळापासून लाईमलाइटपासून दूर आहे. 2019 नंतर ती कोणत्याही चित्रपटात किंवा शोमध्ये दिसली नाही. शिवाय प्राचीने आपल्या आगामी चित्रपटांविषयी कोणतीही माहिती दिली नाही.
प्राचीने आपल्या करिअरची सुरुवात एकता कपूरच्या 'कसम से' या मालिकेतून केली होती. या शोमध्ये प्राचीसोबत राम कपूरने काम केलं होतं. त्यानंतर प्राचीने 'रॉक ऑन' चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. 'वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई', 'बोल बच्चन', 'आय मी और मैं' या चित्रपटांमध्ये तिनं काम केलं आहे. 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'हाऊसफुल 4' मध्ये ती शेवटची दिसली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood actress