मुंबई, 20 जून : स्टार असा प्रवास करणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा आपल्या ग्लॅमर व्यतिरिक्त सामाजिक कार्यातही खूप सक्रिय आहे. ती भारताकडून यूनिसेफ या आंतरराष्ट्रीय संस्थेची सदिच्छा दूत म्हणू काम पाहते. काही दिवसांपूर्वीच प्रियांकानं इथोपियाच्या रेफ्यूजी कॅम्पला भेट दिली होती. तिच्या या भेटीचे फोटो तिनं तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले होते. त्यानंतर आज प्रियांकानं World Refugee Day च्या निमित्तानं या मुलांसोबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये ती या मुलांसाठी भावनिक आवाहन करताना दिसत आहे.
बहीण सुनैनाच्या आरोपांनंतर हृतिकच्या मदतीला धावून आली एक्स वाइफ सुजैन खान
प्रियांकानं आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर करत सर्वांना या मुलांच्या मदतीसाठी पुढे येण्याचं आवाहन केलं आहे. तिनं लिहिलं, 'साधं सरळ सत्य आहे. या जगाचं भविष्य आजच्या मुलांच्या हातात आहे. मात्र सत्य असं आहे की, ही एक पूर्ण पीढी सध्या कोणत्याही भविष्याशिवाय जगत आहे. ही मुलं विविध भागात झालेल्या संघर्ष आणि वादांमुळे विस्थापनाची शिकार झाली आहेत.'
देसी गर्लनं घातली भारताच्या सन्मानात भर, प्रियांकाला ‘हा’ विशेष पुरस्कार जाहीर
प्रियांका पुढे लिहिते, 'हिंसा, नैसर्गिक संकटं आणि समाजाती काही त्रास देणाऱ्या लोकांमुळे या लोकांना त्यांची घरं सोडवी लागली. मात्र अशा वेळी या लहान मुलांवर खूप जास्त परिणाम होतो. त्यांच्यामध्ये प्रत्येक दिवशी एक प्रकारची भीती कायम असते. त्यामुळे आपण त्यांच्यामागे खंबीरपणे उभं राहणं गरजेचं आहे. आपल्याकडून त्यांच्यासाठी जे काही करणं शक्य आहे ते सर्व आपण करायलाच हवं आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांना मदत करायला हवी. मी आणि यूनिसेफसोबत एकत्र या जेणेकरून आपण सर्व मिळून या निर्वासित मुलांना सुरक्षित राहण्यास मदत करू.'
मोहन भागवत आणि योगी यांच्याविरुद्ध बोलणं पडलं भारी, हार्ड कौरविरुद्ध गुन्हा दाखल
प्रियांका 2006 पासून यूनिसेफसाठी काम करत आहे. 2010 आणि 2016 मध्ये तिला बाल अधिकारांसाठी राष्ट्रीय आणि जागतिक यूनिसेफ सदिच्छा दूत म्हणून निवडण्यात आलं. या शिवाय प्रियांका पर्यावरण, आरोग्य, शिक्षण आणि महिलांच्या विशेषाधिकारां पाठींबा देणे तसेच लैंगिक समानता यासाठीही काम करते. तसेच याविषयीची तिची मतं जगासमोर मांडण्याचं काम करते. तिच्या कामासाठी तिला न्यूयॉर्कमध्ये प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या ‘स्नो फ्लेक बॉल’ या कार्यक्रमात ‘डॅनी काये ह्यूमॅनिटेरियन’ हा विशेष पुरस्कार दिला जाणार आहे.
‘स्नो फ्लेक बॉल’ हा न्यूयॉर्क मधील सर्वात मोठा आणि प्रतिष्ठेचा पुरस्कार समारंभ आहे. ज्यात, यूनिसेफकडून मानवतेच्या कल्याणासाठी काम करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार दिले जातात. या समारंभाचं आयोजन 3 डिसेंबरला न्यूयॉर्कमध्ये केलं जाणार आहे. काही दिवसांपूर्वीच प्रियांका यूनिसेफच्या रेफ्यूजी कॅम्पेनमध्ये सहभागी झाली होती आहे तिनं यावेळचे फोटो तिच्या सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यानंतर भारतातील मुलांसाठी काही तरी कर असा काहीसा नाराजी सूर नेटकऱ्याकडून ऐकायला मिळाला होता.
यावर तिनं तत्परतेनं आपली प्रतिक्रिया दिली होती. ‘मला वाटतं जगातलं कोणतंही मुल हे मुल आहे आणि आपण सर्व ग्लोबल नागरिक आहोत. मला वाटतं आपण आपल्याल देशासोबतच जगातल्या अशाप्रकारच्या मुलांचाही विचार करायला हवा. मी भारतातही यूनिसेफच्या माध्यमातून काम केलं आहे आणि पुढेही करत राहणार आहे.’ अशा शब्दात तिनं सडेतोड उत्तर देत तिनं टीकाकारांचं तोंड बंद केलं होतं.
View this post on Instagram
===============================================================
VIDEO : सेटवर घुसून कलाकारांना रॉडने मारहाण, माही गिलला दुखापत