मुंबई, 13 जून : अभिनेत्री प्रियांका चोप्रानं अमेरिकन सिंगर निक जोनसशी लग्न केल्यापासून काही ना काही कारणानं चर्चेत असते. देसी गर्लनं परदेशी बाबूशी लग्न केल्यानं अनेकांनी तिच्यावर टीका सुद्धा केली. मात्र प्रियांकानं त्यावर कधीच कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही किंवा आपल्या देशासाठी काम करणं तिनं थांबवलंही नाही. प्रियांका भारत तर्फे यूनिसेफची सदिच्छा दूत म्हणून काम करते आणि आता तिच्या कामाचा सन्मान केला जाणार असून प्रियांकाला न्यूयॉर्कमध्ये प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या ‘स्नो फ्लेक बॉल’ या कार्यक्रमात ‘डॅनी काये ह्यूमॅनिटेरियन’ हा विशेष पुरस्कार दिला जाणार आहे. त्यामुळे प्रियांकानं आता देशाच्या सन्मानात एक नवी भर घातली आहे. Birthday Special : परफेक्ट फिगरसाठी दिशा पाटनी फॉलो करते ‘हा’ डाएट प्लान
प्रियांका चोप्राला यंदाचा ‘डॅनी काये ह्यूमॅनिटेरियन’ पुरस्कार जाहीर झाल्याची माहिती यूनिसेफ यूएसएने ट्विटरवरून दिली. ‘स्नो फ्लेक बॉल’ हा न्यूयॉर्क मधील सर्वात मोठा आणि प्रतिष्ठेचा पुरस्कार समारंभ आहे. ज्यात, यूनिसेफकडून मानवतेच्या कल्याणासाठी काम करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार दिले जातात. या समारंभाचं आयोजन 3 डिसेंबरला न्यूयॉर्कमध्ये केलं जाणार आहे. प्रियांकाला हा पुरस्कार मिळाल्यानंतर सर्व स्तरातून तिचं सध्या कौतुक केलं जात आहे. काही दिवसांपूर्वीच प्रियांका यूनिसेफच्या कॅम्पेनमध्ये सहभागी झाली होती आहे तिनं यावेळचे फोटो तिच्या सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यानंतर भारतातील मुलांसाठी काही तरी कर असा काहीसा नाराजी सूर नेटकऱ्याकडून ऐकायला मिळाला होता. सलमान खानसाठी रोहित शेट्टीची माघार, आता ‘या’ दिवशी रिलीज होणार सूर्यवंशी
BIG NEWS: @UNICEF Goodwill Ambassador @priyankachopra will receive the Danny Kaye Humanitarian Award at our #UNICEFSnowflake Ball this December! An incredible voice for children — including on her recent visit to Ethiopia.
— UNICEF USA (@UNICEFUSA) June 11, 2019
More updates to come! pic.twitter.com/FyXvXVpZNR
यूनिसेफ कडून ‘डॅनी काये ह्यूमॅनिटेरियन’ जाहीर झाल्यानंतर प्रियांकानं यावर आनंद व्यक्त करत चाहत्यांशी या बाबतची माहिती सोशल मीडियावरून शेअर केली. तिनं लिहिलं, ‘स्नो फ्लेक बॉल’मध्ये ‘डॅनी काये ह्यूमॅनिटेरियन’ पुरस्कारनं मला सन्मानित केल्याबद्दल मी यूनिसेफ यूएसएची आभारी आहे. जगातील सर्व लहानमुलांकडून त्यांची शांतता, स्वतंत्र आणि शिक्षण या अधिकारांसाठी यूनिसेफसोबत काम करणं माझ्यासाठी सर्वकाही आहे.
So humbled. Thank u @UNICEFUSA for honouring me with the Danny Kaye Humanitarian Award at the #UNICEFSnowflake Ball in December! My work with @UNICEF on behalf of all the world's children means everything to me..Here’s to peace freedom & the right to education #ForEveryChild pic.twitter.com/OZ4Qppc1y4
— PRIYANKA (@priyankachopra) June 12, 2019
प्रियांका 2006 पासून यूनिसेफसाठी काम करत आहे 2010 आणि 2016 मध्ये तिला बाल अधिकारांसाठी राष्ट्रीय आणि जागतिक यूनिसेफ सदिच्छा दूत म्हणून निवडण्यात आलं. या शिवाय प्रियांका पर्यावरण, आरोग्य, शिक्षण आणि महिलांच्या विशेषाधिकारां पाठींबा देणे तसेच लैंगिक समानता यासाठीही काम करते. तसेच याविषयीची तिची मतं जगासमोर मांडण्याचं काम करते. VIDEO : मराठीतील आत्तापर्यंतचं सगळ्यात बोल्ड गाणं रिलीज
CycloneVayu: चक्रीवादळाचा गुजरातवर परिणाम, समुद्राला उधाण