हास्यकल्लोळ, पावसाने झोडपलं पण तरी मुंबईकरांची क्रिएटीव्हीटी एकदा पाहाच!

हास्यकल्लोळ, पावसाने झोडपलं पण तरी मुंबईकरांची क्रिएटीव्हीटी एकदा पाहाच!

Mumbai Rain मुसळधार पावसामुळे फक्त सर्वसामान्यच नाही तर सिनेस्टारही हैराण झाले. अमिताभ बच्चन यांनी आपल्या जुन्या सिनेमातील बोटीतील एका सीनचा फोटो शेअर केला.

  • Share this:

मुंबई, 03 जुलै- देशाची राजधानी दिल्लीच एकीकडे नागरिक पावसाची वाट पाहत आहेत तर मायानगरी मुंबईत मात्र लोक मुसळधार पावसामुळे हैराण झाले आहेत. मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक भागांत पावसाने थैमान घातलं. सोशल मीडियावर पावसाचे अनेक मीम्सही तयार झाले. हे मीम्स व्हायरल होऊन अनेकजण याची मजा लुटत आहेत.

मुसळधार पावसामुळे फक्त सर्वसामान्यच नाही तर सिनेस्टारही हैराण झाले. अमिताभ बच्चन यांनी आपल्या जुन्या सिनेमातील बोटीतील एका सीनचा फोटो शेअर केला. दो लफ्जों की या गाण्यातील हा सीन आहे. यात बिग बी आणि झिनत अमान दोघं बोटीतून प्रवास करताना दिसत आहे. याच फोटोचा वापर करून बिग बी यांनी मीम तयार केलं. यात जलसावरून जरा गोरेगावला सोड अशी विनंती ते करताना दिसत आहेत.

This is so true ..#MumbaiRains #bindasladki pic.twitter.com/MrKwVFGrnq

याशिवाय टायटॅनिक, वेलकम, फिर हेरा फेरी, सेक्रेड गेम्स यांसारख्या सिनेमातील आणि वेब सीरिजमधील काही सीन वापरून मीम्स तयार करण्यात आले आहेत.

हेरा फेरीमधील बाबूराव आणि गँग्स ऑफ वासेपुरचे अनेक संवादही व्हायरल होत आहेत.

मुसळधार पावसामुळे मुंबईकर हैराण झाले आहेत. मंगळवारी मुंबईमध्ये सार्वजनिक सुट्टीही जाहीर करण्यात आली होती.

अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये पाण्याची बचन करण्यावरून चाहत्यांना सल्ला दिला आहे. बिग बी यांनी लिहिले की, 'आपल्याला पाणी वाचवा आणि पाणी साठवा या मोहिमेला जन आंदोलन केलं पाहिजे.' अमिताभ यांच्या या ट्वीटचं समर्थन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही केलं.

SPECIAL REPORT: ...आणि मैदानात गायीनं घेतला फुटबॉलचा ताबा

First published: July 3, 2019, 1:30 PM IST

ताज्या बातम्या