मुंबई, 13 मे- छोट्या पडद्यावरील(Tv Actress) प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी (Shweta Tiwari) आणि तिच्या नवऱ्यामधील वाद वाढत चालला आहे. याचा सगळा त्रास त्यांच्या मुलाला सहन करावा लागत आहे. नुकताच श्वेता तिवारीने आपल्या सोसायटीमधील CCTV फुटेज शेयर करत अभिनव वर गंभीर आरोप लावले होते. या व्हिडीओमध्ये (Viral Video) श्वेताचा नवरा त्यांच्या मुलाला ओढून घेत असल्याचं दिसत आहे. आता या व्हिडीओची दखल महिला आयोगाने घेतली आहे.
@NCWIndia is perturbed by this reported incident and has taken cognizance of the matter. Chairperson @sharmarekha has written to DGP Maharashtra asking to immediately into the matter and take appropriate action in accordance with the law.https://t.co/Tdqsgo7FBp
— NCW (@NCWIndia) May 12, 2021
श्वेता तिवारीने शेयर केलेला व्हिडीओ बघून यामध्ये महिला आयोगाने सहभाग घेण्याचा निर्णय घेतला आहे. महिला आयोगाच्या ऑफिशियल ट्वीटर अकाऊंटवर लिहिण्यात आलं आहे, की NCW च्या अध्यक्षांनी महाराष्ट्राच्या डीजीपीकडे याची तपासणी करण्याची मागणी केली आहे. महिला आयोगाच्या या ट्वीट नंतर एक गोष्ट स्पष्ट झाली आहे, ती म्हणजे लवकरच मुंबई पोलीस श्वेता आणि अभिनवच्या या प्रकरणावर योग्य ती कारवाई करताना दिसून येतील. (हे वाचा: ‘आणि पुढच्याचं दिवशी तो आम्हाला सोडून गेला’, पुष्कर जोग झाला भावुक ) अभिनव कोहलीने महिला आयोगाच्या या निर्णयाचं स्वागत केल आहे. आणि म्हटलं आहे, ‘आदरणीय अध्यक्ष मी आपणास सांगू इच्छितो की, मी यात काहीही चुकीचं केलं नाहीय. मी आपणाला विनंती करतो की लवकरात लवकर आपण या प्रकरणाची चौकशी करा. त्यामुळे मला माझा मुलगा कुठ आहे याबद्दल समजेल. आणि मला त्याला भेटता येईल. (हे वाचा: अमिताभ बच्चन यांच्यावर गंभीर आरोप; नाकारला BIG B यांचा मदतनिधी ) श्वेता आणि अभिनव यांच्या नात्यात खुपचं तक्रारी आहेत. त्यामुळे ते एकमेकांपासून विभक्त झाले आहेत. आणि या दोघांमध्ये मुलाच्या कस्टडीसाठी केस सुरु आहे. अभिनवला मूळची कस्टडी हवी आहे. मात्र श्वेता यासाठी अजिबात तयार नाहीय. त्यामुळे या दोघांच्यात सतत वादविवाद पाहायला मिळतात. सध्या या दोघांचा वाद सोशल मीडियावर सुद्धा दिसून येत आहे.