मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'आणि पुढच्याचं दिवशी तो आम्हाला सोडून गेला', पुष्कर जोगने सांगितला धक्कादायक अनुभव VIDEO

'आणि पुढच्याचं दिवशी तो आम्हाला सोडून गेला', पुष्कर जोगने सांगितला धक्कादायक अनुभव VIDEO

पुष्करने नुकताच आपल्या इन्स्टाग्रामवर (Instagram Post) व्हिडीओ (Video Viral) शेयर करत आपल्यासोबत आलेल्या एका अत्यंत वाईट अनुभवाचा खुलासा केला आहे.

पुष्करने नुकताच आपल्या इन्स्टाग्रामवर (Instagram Post) व्हिडीओ (Video Viral) शेयर करत आपल्यासोबत आलेल्या एका अत्यंत वाईट अनुभवाचा खुलासा केला आहे.

पुष्करने नुकताच आपल्या इन्स्टाग्रामवर (Instagram Post) व्हिडीओ (Video Viral) शेयर करत आपल्यासोबत आलेल्या एका अत्यंत वाईट अनुभवाचा खुलासा केला आहे.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 12 मे-   सध्याचा काळ सर्वांसाठीचं खूप कठीण आहे. कित्येक लोकांना आपल्या जवळच्या माणसांना गमवावं लागलं आहे. सगळीकडे फक्त आणि फक्त नकारात्मक वातावरण दिसत आहे. त्यामुळे एकमेकांना आपलुकीच्या दोन शब्दांची गरज आहे. असाच काहीसा अनुभव अभिनेता पुष्कर जोगला (Pushkar Jog) आला आहे. पुष्करने नुकताच आपल्या इन्स्टाग्रामवर (Instagram Post) व्हिडीओ (Video Viral) शेयर करत आपल्यासोबत आलेल्या एका अत्यंत वाईट अनुभवाचा खुलासा केला आहे. त्याचबरोबर अत्यंत महत्वाचा संदेश देखील दिला आहे.

अभिनेता पुष्कर जोगने नुकताच आपल्या मामांला गमावलं आहे. काही दिवसांपूर्वी पुष्करला त्यांचा कॉल आला होता. मात्र पुष्करला कॉल घेता नाही आला. आणि नंतर घाईगडबडीत त्यांना परत कॉल करायचा राहून गेला. आणि त्याच्या पुढच्याच दिवशी पुष्करला समजलं की त्याचा मामा गेला. असा हा अत्यंत भावनिक प्रसंग पुष्करने आपल्या चाहत्यांसोबत शेयर केला आहे. पुष्करने अत्यंत भावुक होतं म्हटलं आहे, कृपा करून आपल्या जवळच्या लोकांचा, मित्रांचा फोन अजिबात टाळू नका. वेळ खूप क्षणभंगुर आहे.

(हे वाचा:हुमा कुरेशी उभारतेय रुग्णालय, हॉलिवूड दिग्दर्शकाचीही मदतीला धाव  )

आपल्या इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट करत पुष्करने म्हटलं आहे, ‘मी व्यक्त होण्याचा विचार करत होतो आज थोडी हिम्मत झाली .काही दिवसांपूर्वी माझा मामा गेल्याचा पोस्ट मी टाकला होता त्या वेळेस चा मिसड कॉल माझे मन अजून हि खात आहे .. तुम्हा सर्वांना माझी विनंती आहे कृपा करून एकमेकांच्या संपर्कांत रहा .लॉक डाऊन असल्या मुळे सर्वांशी संपर्क होत नाहीये हे योग्य नाही . हा काळ आपल्या सर्वांसाठी प्रचंड कठीण आहे तेव्हा हेवे दावे , रुसवे फुगवे , वैचारिक मतभेद सर्व काही प्लिज प्लिज बाजूला ठेवा आणि आपल्या नातेवाईक , मित्र परिवार व आप्त स्वकीयांसह संपर्कात रहा . कॉल मेसेज तर कधीच कुणाचा मिस करू नका अशी माझी तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती आहे. लवकरच हा वाईट काळ सरेल आणि आपण सर्व पुन्हा नव्या जोमाने कामाला लागू’.

(हे वाचा:ओळखा पाहू ही चिमुरडी आहे तरी कोण? आज आहे मराठीतील Bold अभिनेत्री  )

अशा आशयाची अत्यंत भावुक पोस्ट पुष्करने केली आहे. व्हिडीओमध्ये तर पुष्करला अत्यंत गहिवरून आलं आहे. पुष्करच्या या पोस्टवर चाहते व इतर कलाकार सुद्धा कमेंट करून पुष्करला धीर देण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र पुष्करने दिलेला हा संदेश खरंच प्रत्येक व्यक्तीला विचार करायला लावणारा आहे.

First published:

Tags: Instagram post, Marathi entertainment, Social media viral