मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

अमिताभ बच्चन यांच्यावर गंभीर आरोप; नाकारला BIG B यांचा मदतनिधी

अमिताभ बच्चन यांच्यावर गंभीर आरोप; नाकारला BIG B यांचा मदतनिधी

उदा. जर एक कोटी रक्कम जिंकली, तर त्यातील 70 लाख रुपये स्पर्धकाला मिळतात. (फाइल फोटो)

उदा. जर एक कोटी रक्कम जिंकली, तर त्यातील 70 लाख रुपये स्पर्धकाला मिळतात. (फाइल फोटो)

बॉलिवूड बिग बी (Bollywood) अमिताभ बच्चन (Amitabh Bacchan) यांनी दिल्लीमधील शीख गुरुद्वाराला तब्बल 2 कोटींची मदत केली आहे.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 13 मे-   कोरोना (Coronavirus)  काळात अनेक कलाकार मदतीसाठी धावून येत आहेत. याच पार्श्वभूमीवर बॉलिवूड बिग बी (Bollywood) अमिताभ बच्चन (Amitabh Bacchan) यांनी दिल्लीमधील शीख गुरुद्वाराला तब्बल 2 कोटींची मदत केली आहे. मात्र उत्तर प्रदेश राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे सदस्य परविंदर सिंग यांनी दिल्ली गुरुद्वार कमेटीची निंदा केली आहे. त्याचबरोबर त्यांनी अमिताभ यांच्यावर गंभीर आरोपसुद्धा केले आहेत. तसेच त्यांनी दिल्ली गुरुद्वार प्रबंधक कमिटीचे (Delhi Sikh Prabandhak Committee) अध्यक्ष सरदार मनजिंदर सिंग सिरसा यांच्याकडे हा निधी तात्काळ परत करण्याची मागणी सुद्धा केली आहे.

परविंदर सिंग यांनी म्हटलं आहे, ‘1984 पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर शीख समुदाया विरोधी झालेला हल्ला भडकवण्यात अमिताभ बच्चन यांचाही मोठा हात असल्याचं सांगितलं जात. त्यामुळे अशा व्यक्तीकडून मिळालेली मदत कोणत्याही समाजासाठी एखाद्या विषासारखीचं आहे. अशा व्यक्तीकडून निधी स्वीकारणं म्हणजे शीख समुदायाच्या एकजूटीवर प्रश्न उभारण्या सारखं असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे’.

(हे वाचा:अभिजीत सावंतला गाण्याची संधी का मिळाली नाही? हे आहे बॉलिवूडचं धक्कादायक वास्तव )

तसेच परमिंदर म्हणाले, ‘ज्यावेळी आम्हाला पैशांची गरज असेल, तेव्हा आम्ही सर्वजण प्रत्येक घराघरात जाऊन मदत मदत मागू, मात्र आमच्या समुदायावर हल्ला करणाऱ्या कोणत्याच व्यक्तीकडून मदत घेणे योग्य नाही’.

(हे वाचा:आयुष्यात पहिल्यांदा हादरलो,ICU बेड न मिळाल्याने मुकेश खन्ना यांच्या बहिणीचं निधन )

अमिताभ बच्चन यांनी दिल्ली शीख गुरुद्वारमध्ये 2 कोटींची मदत केली होती. त्या निधीच्या वापरातून कोरोना रुग्णांसाठी 400 बेडची सुविधा करण्यात आली आहे. ह्या सर्व बेडवर ऑक्सिजनची सुविधा आहे. तसेच यामध्ये वर्ल्ड पंजाबी संघटनेच्या विक्रमसिंग यांनी सुद्धा मदत केली आहे.

First published:

Tags: Amitabh Bachchan, Bollywood, Coronavirus