जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / फरहान अख्तरच्या गर्लफ्रेंडवर Gold Digger असल्याचा आरोप, तिच्या Wikipediaमध्ये छेडछाड

फरहान अख्तरच्या गर्लफ्रेंडवर Gold Digger असल्याचा आरोप, तिच्या Wikipediaमध्ये छेडछाड

फरहान अख्तरच्या गर्लफ्रेंडवर Gold Digger असल्याचा आरोप, तिच्या Wikipediaमध्ये छेडछाड

फरहान अख्तरची (Farhan Akhtar) गर्लफ्रेंड अभिनेत्री शिबानी दांडेकरच्या विकीपीडिया (Wikipedia) पेजमध्ये छेडछाड करण्यात आली आहे. शिबानी रिया चक्रवर्तीच्या (Rhea Chakraborty) जवळच्या मैैत्रिणींपैकी एक आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 10 सप्टेंबर : अभिनेत्री शिबानी दांडेकर (Shibani Dandekar) च्या  Wikipediaमध्ये छेडछाड करण्यात आल्याची घटना घडली आहे. अभिनेत्री शिबानी दांडेकर रिया चक्रवर्तीच्या (Rhea Chakraborty)च्या जवळच्या मित्रपरिवारापैकी एक आहे. तिच्या विकीपीडियामध्ये छेडछाड झाल्याची बाब समोर येत आहे. यामध्ये असे लिहण्यात आले आहे की, ‘शिबानी दांडेकर ही भारतीय गायिका, अभिनेत्री, सूत्रसंचालक आणि Gold Digger आहे. तिने तिचं फ्लॉप करिअर अमेरिकन टेलिव्हिजनमध्ये अँकर म्हणून सुरू केले.’ अशाप्रकारे शिबानीवर विकीपीडियाच्या माध्यमातून गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

News18

शिबानी दांडेकर रियाची जवळची मैत्रिण आहे. त्याचबरोबर वेळोवेळी तिने रियाला पाठिंबा देखील दर्शवला आहे. बुधवारी सुशांत सिंह राजपूतची एक्स गर्लफ्रेंड अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) हिने खुले पत्र लिहून रिया-सुशांत प्रकरणाबाबत तिचे मत व्यक्त केले होते.  तिने या प्रकरणातील ड्रग अँगलबाबत देखील भाष्य केले होते. यानंतर शिबानी दांडेकरने अंकिताला इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून लक्ष्य केले होते. त्यामुळे शिबानी पुन्हा एकदा चर्चेत आली होती. (हे वाचा- ‘ड्रग्ज प्रकरणात NCB ने जबरदस्तीने घेतला कबुलीजबाब’, रिया चक्रवर्तीचा आरोप ) यावेळी शिबानीने असे लिहिले होते की, ‘अंकिताचे असे विचित्र पत्र… तिने सुशांतबरोबर स्वतःच्या नात्यातील समस्यांशी डील केले नाही, तिला स्पष्टपणे तिला दोन सेकंदाची प्रसिद्धी हवी आहे आणि ती तिने रियाला लक्ष्य करून मिळवली आहे. या ‘विच हंट’मध्ये तिची देखील प्रमुख भूमिका आहे. सुशांतचे रियावर प्रेम होते. तुझा द्वेष करणाऱ्यांना पत्र लिहिण्याआधी, कृपया हे नमुद करून घे कोणाच्याही मनात इतका द्वेष नाही (?) जितका तुझ्या आहे.’

जाहिरात

(हे वाचा- ‘शिवसेना से सोनिया सेना’, कडक शब्दात टीका करणारं कंगनाचं आणखी एक ट्वीट) शिबानीच्या या पोस्टनंतर विकीपीडियामध्ये छेडछाड झाली आहे. अंकिताने तिच्या पोस्टमध्ये सुशांंतच्या नैराश्याबद्दल भाष्य करत रियावर टीका केली होती. ‘जाहिरपणे जर ती सांगतेय की तो नैराश्यात होता अशावेळी जेव्हा तिला त्याच्या मानसिक स्थितीबाबत माहित होते तर अशा नैराश्यग्रस्त माणसाला तिने ड्रग्ज घ्यायला परवानगी द्यायला हवी होती का?’ असा सवाल अंकिताने तिच्या पोस्टमधून रियाबाबत विचारला होता. त्याचप्रमाणे तिने आणखी एक पोस्ट करत अभिनेत्री कंगना रणौत हिला पाठिंबा देखील दर्शवला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात