Home /News /entertainment /

'ड्रग्ज प्रकरणात NCB ने जबरदस्तीने घेतला कबुलीजबाब', रिया चक्रवर्तीचा आरोप

'ड्रग्ज प्रकरणात NCB ने जबरदस्तीने घेतला कबुलीजबाब', रिया चक्रवर्तीचा आरोप

अभिनेत्री रिया चक्रवर्तीचे (Rhea Chakraborty) असे म्हणणे आहे की, ड्रग्ज प्रकरणात एनसीबीच्या चौकशीदरम्यान तिला तिच्यावर करण्यात आलेले आरोप मान्य करण्याचा जबाब देण्यास भाग पाडले गेले.

    मुंबई, 10 सप्टेंबर : सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात (Sushant Singh Rajput Death) समोर आलेल्या ड्रग अँगलमध्ये अभिनेत्री रिया चक्रवर्तीला (Rhea Chakraborty) एनसीबीकडून अटक करण्यात आली आहे. रियाने याप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयामध्ये (Mumbai's Sessions Court) जामिन याचिका दाखल केली. ज्याच्या सुनावणीदरम्यान अभिनेत्रीने नारकोटिक्‍स क्राइम ब्‍यूरो (Narcotics Crime Bureau)वर काही गंभीर आरोप केले आहेत. रियाचे असे म्हणणे आहे की, एनसीबीच्या चौकशीदरम्यान तिला तिच्यावर करण्यात आलेले आरोप मान्य करण्याचा जबाब देण्यास भाग पाडले गेले. एनसीबीने 3 दिवस रियाची चौकशी केल्यानंतर मंगळवारी तिला अटक करण्यात आली. मॅजिस्ट्रेट कोर्टाने तिची जामिन याचिका आधीच फेटाळली आहे. रिया चक्रवर्तीच्या वतीने तिचे वकील सतिश मानेशिंदे (Satish Maneshinde) यांनी जी जामिन याचिका दाखल केली आहे, त्यात असे म्हटले आहे की, अटकेच्या दरम्यान (एनसीबीच्या) याचिकाकर्तीला (रिया) कबुलीजबाब देण्यास भाग पाडले गेले. अभिनेत्री असे सर्व कबुलीजबाब औपचारिकरित्या मागे घेते आहे. याचिकामध्ये रियाने असेही म्हटले आहे की तिची अटक 'अनावश्यक आणि विनाकारण केली गेली'. (हे वाचा-केवळ कंगना नाही तर शाहरुखसह या कलाकारांच्या बंगल्यावर पडला आहे BMC चा हातोडा) मंगळवारी दंडाधिकारी कोर्टाने तिला जामीन नाकारला होता. त्यानंतर रियाने दुसऱ्यांदा जामिनासाठी प्रयत्न केला आहे. बुधवारी ही याचिका वकील सतीश मानशिंदे यांच्या वतीने दाखल करण्यात आली. यात 28 वर्षीय अभिनेत्रीने निर्दोष असल्याचा दावा केला आहे. तिने कोणताही गुन्हा केलेला नाही आणि तिला या प्रकरणात अडकवण्यात आले आहे, असे याचिकेत नमूद केले आहे. (हे वाचा-'शिवसेना से सोनिया सेना', कडक शब्दात टीका करणारं कंगनाचं आणखी एक ट्वीट) रियावर एनडीपीएस कायदा कलम 8 8 (सी), 20 (बी)(2), 22, 27ए, 28 आणि 29 अंतर्गत ड्रग्ज अँगलमध्ये तिचा हात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. रियाव्यतिरिक्त तिला भाऊ शौविक चक्रवर्ती (Showik Chakraborty) आणि अन्य काही जणांना अटक करण्यात आली आहे. या सर्वांच्या जामिन याचिकेवर देखील सुनावणी होत आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Sushant Singh Rajput

    पुढील बातम्या