Home /News /entertainment /

शाहरुख खान का करत नाही अक्षय कुमारसोबत काम? कारण ऐकून तुमचंही डोकं चक्रावेल

शाहरुख खान का करत नाही अक्षय कुमारसोबत काम? कारण ऐकून तुमचंही डोकं चक्रावेल

शाहरुख कधीही अक्षय कुमारसोबत काम करणार नाही, कारण...; केला धक्कादायक खुलासा

    मुंबई 23 जून: शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि अक्षय कुमार (Akshay Kumar) हे दोघंही बॉलिवूडमधील सुपरस्टार अभिनेते म्हणून ओळखले जातात. एकाला रोमान्स किंग म्हटलं जातं तर दुसऱ्याला बॉलिवूडचा अॅक्शनस्टार. दोघंही आपल्या अनोख्या शैलीसाठी ओळखले जातात. या पार्श्वभूमीवर या दोन सुपरस्टार्सला एकाच चित्रपटात पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. परंतु त्यांची ही इच्छा कधीही पुर्ण होणार नाही असे संकेत खुद्द शाहरुख खाननं दिले. (Bollywood movie) त्यानं अक्षय कुमारसोबत काम न करण्याचं कारण सांगितलं. हे कारण ऐकून तुम्ही देखील थक्क व्हाल. ‘मी तुझ्यासारखा भिकारी नाही’; संतापलेल्या अभिनेत्याचं विंदू दारा सिंगला प्रत्युत्तर आज तकला दिलेल्या मुलाखतीत शाहरुखनं आपल्या करिअरवर भाष्य केलं. त्यावेळी त्याने अक्षय कुमारसोबत काम न करण्याचं कारण सांगितलं. तो म्हणाला, “अक्षय खूपच शिस्तप्रिय अभिनेता आहे. तो खूप लवकर उठतो आणि मी उशीरा उठतो. माझा दिवस जेव्हा सुरु होतो तेव्हा अक्षय झोपण्याची तयारी करत असतो. आमच्या जगण्याच्या वेळा परस्पर विरुद्ध आहेत. त्यामुळं आमची भेट कधीही होत नाही. या पार्श्वभूमीवर आम्ही कधी एकत्र काम करु असं वाटत नाही.” लता मंगेशकर यांची खिल्ली उडवणं तन्मय भट्टला पडलं महागात; त्या व्हिडिओमुळे संपलं करिअर अक्षय आणि शाहरुखनं ‘दिल तो पागल है’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. या चित्रपटात अक्षयनं सहाय्यक अभिनेत्याची भूमिका साकारली होती. 1997 साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट जबरदस्त गाणी आणि स्टार कास्टमुळं तुफान गाजला होता. मात्र यानंतर पुन्हा कधीही अक्षय आणि शाहरुख यांनी एकत्र काम केलं नाही. अन् यापुढे देखील ते एकत्र काम करु शकतील असं शाहरुखला वाटत नाही.
    Published by:Mandar Gurav
    First published:

    Tags: Akshay Kumar, Shah Rukh Khan

    पुढील बातम्या