मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /‘मी तुझ्यासारखा भिकारी नाही’; संतापलेल्या अभिनेत्याचं विंदू दारा सिंगला प्रत्युत्तर

‘मी तुझ्यासारखा भिकारी नाही’; संतापलेल्या अभिनेत्याचं विंदू दारा सिंगला प्रत्युत्तर

‘तुझं तोंड डुक्करासारखं आहे’, म्हणताच विंदू दारा सिंग संतापला; अभिनेत्यावर केले मोठे आरोप

‘तुझं तोंड डुक्करासारखं आहे’, म्हणताच विंदू दारा सिंग संतापला; अभिनेत्यावर केले मोठे आरोप

‘तुझं तोंड डुक्करासारखं आहे’, म्हणताच विंदू दारा सिंग संतापला; अभिनेत्यावर केले मोठे आरोप

मुंबई 23 जून: अभिनेता, समिक्षक कमाल आर. खान उर्फ केआरके (KRK) आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळं नेहमीच चर्चेत असतो. देशभरातील राजकारण ते बॉलिवूड सेलिब्रिटी अशा विविध विषयांवर तो रोखठोकपणे आपल्या प्रतिक्रिया देतो. (KRK controversy) यावेळी त्यानं अभिनेता विंदू दारा सिंगसोबत पंगा घेतला आहे. त्यानं विंदूची तुलना डुकरासोबत करत केली होती. (Vindu Dara Singh) यावर संतापलेल्या विंदूनं पैसे घेऊन रिव्ह्यू करणं थांबव असा सल्ला त्याला दिला. मात्र यावर देखील आता केआरकेने त्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. “मी तुझ्यासारखा भीकारी नाही” असं म्हणत त्याची खिल्ली उडवली आहे.

“केआरके हा विक्षिप्त व्यक्ती आहे. जर रिव्हू करण्यासाठी त्याला पैसे मिळाले तर तो त्यांची स्तुती करतो. आणि जर पैसे मिळाले नाही तर चित्रपटावर टीका करतो.” असं म्हणत पैसे घेऊन रिव्ह्यू करणं थांबव असा सल्ला विंदूनं त्याला दिला होता. यावर केआरकेनं देखील जोरदार प्रतिक्रिया दिली. “माणसं आपल्या लायकीनुसारचं बोलतात. पाच वर्षांपूर्वी आजय देवगणनं 25 लाख रुपये घेऊन निगेटिव्ह रिव्ह्यू दिल्याचा आरोप माझ्यावर केला होता. अन् हाच आरोप आता तू करतो आहेस. पण तू पॉझिटिव्ह रिव्ह्यूसाठी पाच लाख घेतले असं सांगतो आहेस. अरे भिकारी माणसा तुझ्यासारखा मी भीकारी नाही.” अशा आशयाचं ट्विट करुन केआरकेनं विंदू दारासिंगसोबत नवा वाद सुरु केला आहे.

लता मंगेशकर यांची खिल्ली उडवणं तन्मय भट्टला पडलं महागात; त्या व्हिडिओमुळे संपलं करिअर

HBD: बॉलिवूडचा चार्मिंग खलनायक; स्मिता पाटीलनं राज बब्बरसाठी सोडलं होतं कुटुंब

हे प्रकरण आहे तरी काय?

कमाल खान आणि मिका सिंग याच्यात सध्या वाद सुरु आहे. या वादात विंदूनं मिकाची बाजू घेत कमालवर टीका केली होती. ही टीका त्याला आवडली नाही त्यामुळं केआरकेनं त्याची तुलना एका डुकरासोबत केली. त्याच्या या तुलनेमुळं विंदू संतापला अन् त्यानं पैसे घेऊन रिव्ह्यू केल्याचे आरोप केआरकेवर केले. आता या आरोपांवर प्रतिक्रिया देत असताना त्यानं विंदूला भीकारी असं म्हटलं आहे.

First published:
top videos

    Tags: Entertainment, Movie review, Tweet