• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • लता मंगेशकर यांची खिल्ली उडवणं तन्मय भट्टला पडलं महागात; त्या व्हिडिओमुळे संपलं करिअर

लता मंगेशकर यांची खिल्ली उडवणं तन्मय भट्टला पडलं महागात; त्या व्हिडिओमुळे संपलं करिअर

लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकरशी पंगा घेणं तन्मय भट्टला पडलं भारी; एकेकाळचा लोकप्रिय विनोदवीर आज जगतोय अज्ञातवासात

 • Share this:
  मुंबई 23 जून: काही वर्षांपूर्वी स्टँडअप कॉमेडियन तन्मय भट्ट (Tanmay Bhat) हा भारतातील सर्वात मोठा युट्यूबर म्हणून ओळखला जायचा. (Indian YouTuber) सर्वसामान्य नेटकऱ्यांसोबतच बॉलिवूडमधील नामांकित सेलिब्रिटी देखील त्याला फॉलो करायचे. त्याचा स्टँडअप कॉमेडी लाईव्ह पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येन गर्दी होत असते. दुबईत केलेल्या एका शोसाठी तर त्यानं तब्बल 40 लाख रुपयांचं मानधन घेतलं होतं. परंतु या अफाट लोकप्रियतेला त्याच्या एका चुकीमुळं उतरती कळा लागली. 2016 साली तन्मयनं युट्यूबवर एक व्हिडीओ शेअर केला होता. खरं तर हा व्हिडीओ कलाकारांची मिमिक्री करण्याच्या उद्देशानं त्यानं शेअर केल्याचं म्हटलं. यामध्ये त्यानं प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर (Lata Mangeshkar) आणि भारतीय माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांची मिमिक्री केली होती. आश्चर्याची बाब म्हणजे या व्हिडीओमध्ये त्यानं अश्लील शब्दांचा वापर करत त्यांची मिमिक्री केली होती. हे दोन सेलिब्रिटी एकमेकांची खिल्ली कशी उडवतील हे दाखवण त्यामागचा प्रयत्न होता. परंतु त्याचा तो प्रयत्न फसला. अन् नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केलं. HBD: बॉलिवूडचा चार्मिंग खलनायक; स्मिता पाटीलनं राज बब्बरसाठी सोडलं होतं कुटुंब सचिन आणि लता मंगेशकर यांच्या चाहत्यांनी तर त्याच्या विरोधात पोलीस तक्रार देखील दाखल करण्याचा प्रयत्न केला. परंतु सचिन आणि लता यांनी कुठलीही प्रतिक्रिया न दिल्यामुळं त्यांच्या विरोधात कारवाई झाली नाही. या व्हिडीओमुळं तन्मयच्या करिअरला उतरती कळा लागली. कधीकाळी कोट्यवधी फॉलोअर्सच्या घरात असलेला तन्मय काही शेकडोंमध्ये पोहोचला. त्याचे शो रद्द करण्यात आले. शिवाय त्याच्या युट्यूब चॅनेलवर बंदी घालण्यात आली. त्यानंतर तन्मयनं AIB नावाचा एक शो सुरु केला. मात्र तो शोदेखील काही काळानंतर आपल्या अश्लील कंटेंडमुळं बंद झाला. कधीकाळी एक लोकप्रिय विनोदवीर म्हणून ओळखला जाणार तन्मय सध्या अज्ञातवासात आयुष्य जगत आहे.
  Published by:Mandar Gurav
  First published: