Home /News /entertainment /

TMKC: राजपाल यादवनं का दिला होता जेठालाल साकारण्यास नकार?

TMKC: राजपाल यादवनं का दिला होता जेठालाल साकारण्यास नकार?

जेठालाल या व्यक्तिरेखेसाठी आधी प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव (Rajpal Yadav) याला विचारण्यात आलं होतं. परंतु त्याने नकार दिल्यामुळे ही भूमिका दिलीप जोशींकडे आली.

    मुंबई 21 जुलै: ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय विनोदी मालिका आहे. गेली 13 वर्ष ही मालिका सातत्याने प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. परंतु या मालिकेच्या यशात अभिनेते दिलीप जोशी (Dilip Joshi) यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी साकारलेल्या जेठालाल चंपकलाल गडा (Jethalal Champaklal Gada) या व्यक्तिरेखेमुळेच तारक मेहताला इतकी लोकप्रियता मिळाली असं म्हटलं जातं. परंतु तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल जेठालाल या व्यक्तिरेखेसाठी आधी प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव (Rajpal Yadav) याला विचारण्यात आलं होतं. परंतु त्याने नकार दिल्यामुळे ही भूमिका दिलीप जोशींकडे आली. राजपाल यादवनं का दिला होता नकार? राजपाल यादव आपल्या विनोदी व्यक्तिरेखांसाठी प्रसिद्ध आहे. किंबहूना तो बॉलिवूड चित्रपटांमध्ये विनोदविराच्याच भूमिकेत अधिक दिसतो. आपल्या युनिक टाईमिंगच्या जोरावर त्याने बॉलिवूडमध्ये स्वत:ची अशी एक वेगळी ओळख प्रस्थापित केली आहे. त्यामुळेच निर्माता आसित मोदी यांनी जेठालालच्या भूमिकेसाठी राजपालला विचारलं होतं. परंतु त्याने या भूमिकेसाठी नकार दिला. राज कुंद्रा कसा करायचा Pornography बिझनेस? कमवायचा बक्कळ पैसे ‘तर मी देखील तुरुंगात असते’; राज कुंद्रानं या अभिनेत्रीला दिली होती Pornographyची ऑफर राजपालला कायमच चित्रपटांचं आकर्षण राहिलं आहे. आतापर्यंत त्याला अनेक मालिकांच्या ऑफर मिळाल्या. परंतु त्याने कायमच नकार दिला. कारण त्याला एकाच भूमिकेत अडकून राहायचं नव्हतं. मालिका वर्षानुवर्ष चालतात. अन् इतका काळ एकाच प्रोजेक्टमध्ये गुंतून राहाणं हे राजपालला मान्य नव्हतं. शिवाय त्या काळात त्याच्याकडे अनेक चित्रपटांच्या ऑफर देखील होत्या. त्यामुळे त्याने जेठालाल साकारण्यास नकार दिला. स्वत: राजपालनं सिद्धार्थ काननला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली. जेठालालच्या भूमिकेसाठी किकू शारदा आणि योगेश त्रिपाठी यांना देखील विचारण्यात आलं होतं.
    Published by:Mandar Gurav
    First published:

    Tags: Comedy actor, Entertainment, Rajpal yadav, Taarak mehta ka ooltah chashma

    पुढील बातम्या