• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 •  ‘तर मी देखील तुरुंगात असते’; राज कुंद्रानं या अभिनेत्रीला दिली होती Pornographyची ऑफर

 ‘तर मी देखील तुरुंगात असते’; राज कुंद्रानं या अभिनेत्रीला दिली होती Pornographyची ऑफर

'मला पॉर्नपटांची ऑफर दिली होती'; प्रसिद्ध अभिनेत्रीचा राज कुंद्रावर आरोप

 • Share this:
  मुंबई 21 जुलै: शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती राज कुंद्रा (Raj Kundra) याला पॉर्नोग्राफी प्रकरणी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) अटक केली आहे. या प्रकरणात सतत नवनवे खुलासे होत आहेत. राज हॉटशॉट नामक एका ब्रिटीश कंपनीसाठी पॉर्नपटांची निर्मिती करत असल्याची माहिती समोर आहे. दरम्यान अशा अश्लील व्हिडीओंसाठी अभिनेत्री पुनीत कौर (Puneet Kaur) हिला देखील विचारण्यात आलं होतं. परंतु तिने वेळीच सावध होत त्यांना नकार दिला. मुंबई पोलिसांचा मोठा खुलासा; राज कुंद्रा या कंपनीसाठी करत होता पॉर्नोग्राफी पुनीत ही एक प्रसिद्ध युट्यूबवर आहे. ती काही जाहिरातींमध्ये देखील झळकली आहे. सोशल मीडियावरील आपल्या ग्मॅमरस आणि बोल्ड फोटोंमुळे ती चर्चेत असते. इन्स्टाग्रामवर तिला लाखो नेटकरी फॉलो करतात. त्यामुळे राज कुंद्रानं तिला हॉटशॉटवरील पॉर्न चित्रपटांमध्ये काम करण्याची ऑफर दिली होती. यासाठी तिला लाखो रुपयांचं मानधन देखील मिळणार होतं. परंतु तिने वेळीच सावध पवित्रा घेत त्याला नकार दिला. हा दावा पुनीतने एका इन्स्टाग्राम पोस्टद्वारे केला आहे. तिची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. राज कुंद्रा केसमध्ये काय आहे शिल्पा शेट्टीची भूमिका? पोलिसांनी केला महत्त्वाचा खुलासा हे प्रकरण नेमकं आहे तरी काय? फेब्रुवारी महिन्यात मुंबई पोलिसांच्या एका पथकाने मढ येथील ग्रीन पार्क बंगलोवर धाड टाकली होती. याठिकाणी पॉर्नोग्राफिक शुटिंग होत असल्याच्या माहितीनंतर ही कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी पोलिसांनी पाच जणांना अटक केली होती. तर एका मुलीची सुटका केली होती. अटक करण्यात आलेल्या पाच जणांमध्ये दोन अभिनेत्यांचा, तर दोन तरुणींचा समावेश आहे. या दोन्ही तरुणी अभिनयाच्या क्षेत्रात नशिब आजमवण्यासाठी आल्या होत्या. मात्र, त्या पॉर्नोग्राफिक व्हिडीओ तयार करणाऱ्या प्रोडक्शन हाऊसच्या जाळ्यात अडकल्या. ही मोठी कारवाई केल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू केला होता.
  Published by:Mandar Gurav
  First published: