• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • मंदिरा बेदीने पतीच्या निधनाआधी 'ती' पोस्ट का केली होती? नेटिझन्सनी विचारले प्रश्न

मंदिरा बेदीने पतीच्या निधनाआधी 'ती' पोस्ट का केली होती? नेटिझन्सनी विचारले प्रश्न

'वेळ ठरवत नाही की तुम्ही कोणाच्या किती जवळ आहात....' मंदिराने पतीच्या मृत्युच्या दोनच दिवस आधी ती पोस्ट का केली होती. पाहा काय आहे.

 • Share this:
  मुंबई 1 जुलै : प्रसिद्ध टीव्ही निवेदक आणि अभिनेत्री मंदिरा बेदीच्या (Mandira Bedi) पतीच दिग्दर्शक राज कौशल (Raj Kaushal) यांचं अचानक 30 जून ला पहाटे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झालं. यामुळे संपूर्ण बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. मंदिरावर यामुळे दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. मंदिराने पतीच्या मृत्यूच्या काही तास आधीच तिच्या सोशल मीडियावर काही स्टोरीही पोस्ट केल्या होत्या. जेव्हा तिला असं काही घडेल याची चाहूल देखील नव्हती. फिटनेस फ्रीक असणारी मंदिरा अतिशय फिट आहे. वर्कआऊट करतानाचा एक फोटो तिने 29 जूनच्या रात्री स्टोरीवर शेअर केला होता. ज्यात तिने कॅप्शनमध्ये लिहिलं होतं की, धावा, उड्या मारा खूश राहा. इतकचं नाही तर राज कौशल यांच्या मृत्यूच्या दोन दिवस आधीही मंदिराने एक पोस्ट केली त्यामुळे अनेकांना प्रश्न पडले आहेत. त्या पोस्ट मध्ये मंदिराने लिहिलं आहे, ‘कोणतीही अपराधीपणाची भावना नाही.. वेळ ठरवत नाही की तुम्ही कोणाच्या किती जवळ आहात. खूप लोक आहेत ज्यांना मी वर्षानुवर्षे ओळखते, त्यांच्यासोबत संबंध संपले की ते कधी नव्हतेच. आणि काही नव्याने संबंध प्रस्थापित झाले आहेत जे वाटतं की अनेक वर्षानुवर्षांचे आहेत. त्यामुळे पुढे जा आणि नव्याला आपलसं करा. कोणत्याही अपराधीपणाच्या भावनेशिवाय आणि प्रश्नांशिवाय.’
  View this post on Instagram

  A post shared by Mandira Bedi (@mandirabedi)

  मंदिराच्या या पोस्टवर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. व राज आणि मंदिरा यांच्यात सगळं काही अलबेल तर होत ना असेही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. काहींनी तर ‘घटस्फोट का?’ असा प्रश्नही विचारला.

  हे प्रसिद्ध एक्स कपल दिसणार 'बिग बॉस मराठी 3'मध्ये? ब्रेकअप नंतर आले होते चर्चेत

  View this post on Instagram

  A post shared by Raj Kaushal (@rajkaushal)

  मंदिरा आणि राज यांनी 1999 साली विवाह केला होता. 2011 साली त्यांनी एका मुलाला जन्म दिला तर मागील वर्षी त्यांनी एक 4 वर्षांची मुलगी दत्तक घेतली होती. राज यांनीही  दोनच दिवसांपर्वी सोशल मीडिया वर एक पोस्ट केली होती ज्यात ते पार्टी करताना आनंदी दिसत आहेत तर त्यात मंदिरा आणि त्यांचे काही मित्र ही सामील दिसत आहेत.
  Published by:News Digital
  First published: