मुंबई 1 जुलै: छोट्या पडद्यावर चा लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त म्हणून ओळखला जाणारा शो ‘बिग बॉस मराठी’ (Big Boss Marathi) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अनेक कलाकारांची यासाठी नावेही पुढे येत आहेत. त्यातच आता एका प्रसिद्ध जोडीच नाव समोर येत आहे. छोट्या पडद्यावरची लोकप्रिय अभिनेत्री अक्षया देवधर (Akshaya Deodhar) आणि लोकप्रिय अभिनेता सुयश टिळक (Suyash Tilak) यांची नावं पुढे येत आहेत. अक्षया आणि सुयश दोघेही त्यांच्या ब्रेकअप नंतर फारच चर्चेत होते. काही महिन्यांपूर्वी त्यांचं ब्रेकअप झालं होत.
सुयश आणि अक्षया यांचं नातं हे त्यांच्या चाहत्यांमध्येही उघड होत. याखेरीज त्यांच्या साखरपुड्याच्याही बातम्या येत होत्या. पण काही काळानंतर त्यांचं ब्रेकअप झाल्याचं समोर आलं. तर आता ते बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वात (Big boss Marathi season 3) दिसणार असल्याची चर्चा रंगली आहे.
काही साईट्सनी दिलेल्या वृत्तानुसार ते बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वात दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहेत. तर त्यांना विचारणा ही झाल्याचं समोर येत आहे. मागील वर्षभरापासून प्रेक्षकांना बिग बॉसच्या पुढच्या पर्वाची आतुरता आहे. मात्र लॉकडाउनमुळे (Lockdown) ते रद्द करण्यात आलं होतं पण आता कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं काही दिवसांपूर्वीच जाहीर झालं आहे.
‘धनगर राजा वसाड गावचा’; चिमुकल्या गायिकेमुळे मुग्धा वैशंपायन झाली थक्कअनेक स्पर्धकांची नावं समोर येत आहेत. त्यामुळे नक्की कोण स्पर्धक असणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. पहिल्या पर्वात मेघा धाडे (Megha Dhade) ही विजेती ठरली होती तर दुसऱ्या पर्वात शिव ठाकरे (Shiv Thakre) विजेता ठरला होता. आता तिसऱ्या पर्वाची प्रेक्षकांना आतुरता आहे.