Home /News /entertainment /

‘मी लो बजेट सेलिब्रिटींचे रिव्हू करत नाही’; KRK नं उडवली विद्या बालनची खिल्ली

‘मी लो बजेट सेलिब्रिटींचे रिव्हू करत नाही’; KRK नं उडवली विद्या बालनची खिल्ली

कंगना रणौतनंतर केआरकेनं घेतला विद्या बालनशी पंगा; स्वत:ला सर्वश्रेष्ठ समिक्षक म्हणत उडवली शेरनी चित्रपटाची खिल्ली

    मुंबई 20 जून: “मी एक ब्रँड आहे. असल्या छोट्या बजेटच्या चित्रपटांचं समिक्षण मी करत नाही.” असं म्हणत अभिनेता कमाल आर खान उर्फ केआरकेने (KRK) विद्या बालनच्या (Vidya Balan) शेरनी (Sherni) चित्रपटाची खिल्ली उडवली आहे. केआरके कायमच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळं चर्चेत असतो. तो अनेकदा बॉलिवूड सेलिब्रिटींवर टीका करताना दिसतो. यावेळी त्यानं विद्या बालनवर निशाणा साधला आहे. तिच्या शेरनी चित्रपटाची खिल्ली उडवत तो जगातील सर्वश्रेष्ठ असा समिक्षक आहे असा दावा केला आहे. “अनेकांनी मला शेरनी चित्रपटाचं समिक्षण करण्यास सांगितलं. कृपया लक्ष द्या. मी अशा लो बजेट चित्रपटांचं समिक्षण करत नाही. मी अशा चित्रपटांवर माझा किंमती वेळ वाया घालवत नाही. कारण मी एक ब्रँड आहे. जगातील सर्वश्रेष्ठ असा समिक्षक.” अशा आशयाचं ट्विट करत केआरकेनं विद्या बालनच्या शेरनी चित्रपटाची खिल्ली उडवली आहे. त्याचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. ‘टीम इंडिया जिंकल्यास कपडे उतरवणार’; पूनम पांडेची मोठी घोषणा 'पानी पानी रे...'; पाहा स्मिता गोंदकरची भटकंती; घेतेय बोटिंगची मजा यापूर्वी केआरेनं कंगना रणौतशी पंगा घेतला होता. तिची देखील खिल्ली उडवली होती. केआरकेने एक भला मोठा व्हिडीओ शेअर करत कंगना रणौतची फिरकी घेतली. त्यानं हा व्हिडीओ आपल्या यूट्यूब चॅनलवर शेअर केला आहे. “मी कंगना रणौत 12 वी नापास, समाजात द्वेष पसरवण्यात मी पीएचडी केली आहे. माला चार राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. असं असताना देखील तुम्ही माझा पासपोर्ट रिन्यू केला नाही? का तर माझ्यावर देशद्रोहाचा आरोप आहे म्हणून. हे पाहा मला देशाबाहेर शूटिंगला जायचं आहे. कारण मला पैसे देखील कमवायचे आहेत. तुम्ही बॉलिवूडच्या क्वीनचा राग अजून पाहिला नाहिये.” असं म्हणत केआरकेने या व्हिडीओमध्ये कंगनाची नक्कल केली. या व्हिडीओद्वारे त्यानं तिची यथेच्च खिल्ली उडवली. शिवाय सेटिंग लावून तिनं चार राष्ट्रीय पुरस्कार मिळवले असे आरोप देखील त्यानं केले.
    Published by:Mandar Gurav
    First published:

    Tags: Entertainment, Movie review, Vidya Balan

    पुढील बातम्या