
'पप्पी दे पारुला' या गाण्यातून नावारुपास आलेली स्मिता गोंदकर ही मराठी मनोरंजनसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओलखली जाते.

स्मिताला मराठी फिल्म इंडस्ट्रीतील बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री म्हणून ओळखलं जातं.

सोशल मीडियावर ती नेहमीच ग्लॅमरस फोटो आणि व्हिडीओज शेअर करत असते. मात्र यावेळी तिनं निसर्गाचा आनंद घेतानाचे फोटो शेअर केले आहेत.

तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. स्मितानं हे फोटो नेमके कुठे काढले याबाबत काहीच सांगितलेलं नाही. मात्र यामध्ये ती बोटिंगचा आनंद घेताना दिसत आहे.

‘पप्पी दे पारूला’ या आयटम साँगमधून चर्चेत आलेली स्मिता थेट ‘बिग बॉस मराठी’ मधील पहिल्या सीझनमध्ये झळकली होती. तेव्हापासून स्मिताचे चाहते खूपच वाढले आहेत.

स्मिता सध्या काय घडलं त्या रात्री या मालिकेत झळकताना दिसत आहे. या मालिकेत तिनं संजना ही भूमिका साकारली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.