मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Career flop पण जगतोय राजासारखा; ‘Mohabbatein’ फेम Jugal Hansraj करतोय काय?

Career flop पण जगतोय राजासारखा; ‘Mohabbatein’ फेम Jugal Hansraj करतोय काय?

‘मोहब्बतें’ फेम जुगल हंसराज सध्या करतोय तरी काय? त्याचं बॉलिवूड करिअर सुपरफ्लॉप आहे. मात्र तरी देखील तो एक आलिशान आयुष्य जगत आहे.

‘मोहब्बतें’ फेम जुगल हंसराज सध्या करतोय तरी काय? त्याचं बॉलिवूड करिअर सुपरफ्लॉप आहे. मात्र तरी देखील तो एक आलिशान आयुष्य जगत आहे.

‘मोहब्बतें’ फेम जुगल हंसराज सध्या करतोय तरी काय? त्याचं बॉलिवूड करिअर सुपरफ्लॉप आहे. मात्र तरी देखील तो एक आलिशान आयुष्य जगत आहे.

मुंबई 26 जुलै: बॉलिवूडमध्ये असे अनेक सेलिब्रिटी आहेत ज्यांना पहिल्याच चित्रपटानंतर फार प्रसिद्धी मिळाली. पण नंतर ते इंडस्ट्रीतून एकाएकी गायब झाले. जुगल हंसराज (Jugal Hansraj) हा देखील अशाच कलाकारांपैकी एक आहे. आज जुगलचा वाढदिवस आहे. (Jugal Hansraj birthday) या निमित्ताने जाणून घेऊया ‘मोहब्बतें’ फेम जुगल हंसराज सध्या करतोय तरी काय? त्याचं बॉलिवूड करिअर सुपरफ्लॉप आहे. (Where is Jugal Hansraj now) मात्र तरी देखील तो एक आलिशान आयुष्य जगत आहे.

जुगलनं 1983 साली ‘मासूम’ या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. यामध्ये त्याने एका बालकलाकाराची भूमिका साकारली होती. त्यानंतर 'पापा कहते हैं' या चित्रपटात हिरो म्हणून पहिल्यांदा त्याने काम केलं. पुढे सुलतान, लोहा, आ गले लग जा, कर्मा यांसारख्या काही चित्रपटांमध्ये त्याने लहानमोठ्या भूमिका साकारल्या. 2000 साली प्रदर्शित झालेल्या ‘मोहबत्तें’ या चित्रपटामुळे तो खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आला. या चित्रपटात त्याने एका विद्यार्थ्याची भूमिका साकारली होती. मात्र या मल्टिस्टारर चित्रपटानंतर त्याने कोणताच हिट चित्रपट दिला नाही.

‘महाराष्ट्रात पुरामुळे 150 बळी, मात्र मराठी कलाकार गप्पच’; संतापलेल्या चाहत्यांचा रोखठोक सवाल

2002 मध्ये त्याने 'प्यार तुम्ही से कर बैठे' या चित्रपटात भूमिका साकारली. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. त्यानंतर जुगलने खूप मोठा ब्रेक घेतला. 2010 मध्ये 'प्यार इम्पॉसिबल'मध्ये तो झळकला. हा चित्रपटसुद्धा बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला. या चित्रपटानंतर जुगलने अभिनय क्षेत्राला रामराम केलं. 2014 मध्ये त्याने गर्लफ्रेंड जास्मिनशी ऑकलँडमध्ये लग्नगाठ बांधली. या लग्नसोहळ्याला फक्त दोघांचे कुटुंबीय व मोजका मित्रपरिवार उपस्थित होता.

‘लिपस्टिकमुळे माझी लायकी काढली’; या मराठी अभिनेत्रीवर करण्यात आला चोरीचा आरोप

जुगल सध्या करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शन हाऊसमध्ये काम करतो. क्रिएटिव्ह टीममध्ये तो काम करतो. तो उत्तम लेखन करतो. करण आणि जुगल एकमेकांचे चांगले मित्र आहेत. करणच्या 'कुछ कुछ होता है' चित्रपटाच्या शीर्षकगीतातील ओळी जुगलने लिहिल्या होत्या. जुगलची पत्नी जास्मिन न्यूयॉर्कमध्ये इन्वेस्टमेंट बँकर आहे. त्यामुळे तो आपल्या पत्नीसोबत न्यूयॉर्कमध्येच राहातो. शिवाय त्याची स्वत:ची काही रेस्तरॉ देखील आहे. यामधून मिळणाऱ्या पैशांच्या जोरावर त्याने आपली आलिशान लाईफस्टाईल मेंटेन केली आहे.

First published:

Tags: Bollywood actor, Career in danger, Entertainment