• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • ‘पुरामुळे 150 बळी, मात्र मराठी कलाकार गप्पच’; संतापलेल्या चाहत्यांचा रोखठोक सवाल

‘पुरामुळे 150 बळी, मात्र मराठी कलाकार गप्पच’; संतापलेल्या चाहत्यांचा रोखठोक सवाल

‘भरत जाधव वगळता बाकीचे कुठे गेले?’ मराठी कलाकारांवर होतेय जोरदार टीका

 • Share this:
  मुंबई 25 जुलै: गेले काही दिवस संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडतोय. (Heavy rainfall) या पावसामुळे राज्यातील लोकांची जणू झोपच उडाली आहे. सगळीकडे पाणीच पाणी अशी अवस्था झाली आहे. कधीनव्हे ते यावर्षी कोकणात देखील पावसामुळे पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली. (Heavy rainfall konkan) तेथील लोकांचं आयुष्य विस्कळीत झालं आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत कोकणी माणसाला मदतीचा हात देण्यासाठी अभिनेता भरत जाधव (Bharat Jadhav) पुढे सरसावला आहे. त्याच्या या मदतीचं सर्वत्र कौतुक होत आहे. पण सोबतच इतर मराठी कलाकारांवर जोरदार टीका देखील केली जात आहे. इतर मराठी कलाकार कुठे आहेत? असा सवाल नेटकरी करत आहेत. ‘लिपस्टिकमुळे माझी लायकी काढली’; या मराठी अभिनेत्रीवर करण्यात आला चोरीचा आरोप भरत जाधवनं एका सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून पुरग्रस्त लोकांना मदत करावी अशी विनंती केली. त्याच्या या विनंतीचा खूपच सकारात्मक परिणाम दिसत आहे. राज्यभरातील लोकांनी शक्य जशी शक्य होईल तशी मदत करण्यास सुरुवात केली आहे. मात्र या प्रतिकूल परिस्थितीत मनोरंजनसृष्टीतील इतर मराठी कलाकार कुठे आहेत? सवाल वारंवार सोशल मीडियावर केला जात आहे. भरत जाधव वगळता एकही कलाकार मदतीसाठी पुढे आलेला दिसत नाही अशी तक्रार काही मराठी प्रेक्षक करत आहेत. ‘अशी चूक पुन्हा होणार नाही’; सलमान खाननं मागितली आथिया शेट्टीची माफी काय म्हणाला होता भरत जाधव? भरत जाधवने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टद्वारे त्याने मदतीची विनंती केली. ही पोस्ट शेअर करताना भरतने लिहिले की, “आपले कोकण हे फक्त वीकेंड ट्रीप एन्जॉय करण्यापुरते नाही. या पूरसंकटात आपापल्या परीने शक्य ती कोकणाला साथ द्या” या पोस्टमध्ये जास्त दिवस टिकतील असे सुके पदार्थ, किराणा सामान, महिला व पुरुषांना लागणारी सर्व प्रकारची अंतर्वस्त्रे, अंथरुण-पांघरूण म्हणून वापरता येणारी जाड कपडे अशा विविध प्रकारे मदत करण्यासाठीची माहिती यावर दिलेली होती. सोबतच संपर्क क्रमांकसुद्धा दिले होते.
  Published by:Mandar Gurav
  First published: