Sushant Singh Rajput: पोलीस शोधताहेत नवा अँगल,यशराजच्या Casting Directorची चौकशी

Sushant Singh Rajput: पोलीस शोधताहेत नवा अँगल,यशराजच्या Casting Directorची चौकशी

शानू शर्मा ही बॉलीवुड ची लोकप्रिय कास्टिंग डायरेक्टर आहे. तिनेच रणवीर सिंह, अर्जुन कूपर आणि वानी कपूर सारख्या नवीन कलाकारांना ब्रेक दिला होता.

  • Share this:

मुंबई 28 जून: अभिनेता सुशांत सिंह राजपूत Sushant Singh Rajput याच्या आत्महत्येप्रकरणी  मुंबई पोलीस कसून चौकशी करत आहेत. पोलीस सर्व शक्यतांचा तपास करत असून सुशांत आणि आणखी कुणाचं पूर्व वैमनस्य होतं का याचाही शोध घेत आहेत. असं काही असल्यास त्याचा सुशांतच्या मानसिकतेवर काही परिणाम झाला असेल का ही शक्यताही पोलीस पडताळून पाहात आहेत. यशराज फिल्म्सची Casting Director शानू शर्मा ( shanu Sharma) हिला आज पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं होतं. या प्रकरणाचा तपास करणारे पोलीस आयुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी याबाबत आज माहिती दिली.

शानू शर्मा ही बॉलीवुड ची लोकप्रिय कास्टिंग डायरेक्टर आहे. तिनेच रणवीर सिंह, अर्जुन कूपर आणि वानी कपूर सारख्या नवीन कलाकारांना ब्रेक दिला होता.

शर्माने सुशांत सिंह राजपूत सोबत यशराज फिल्म्सच्या ‘‘शुद्ध देसी रोमांस’’ आणि ‘‘डिटेक्टिव व्योमकेश बख्शी’’ सारख्या चित्रपटात काम केलं होतं. सुशांतच्या आत्महत्येनंतर यशराज फिल्म्सने सुशांत सोबत झालेल्या कराराची प्रत पोलिसांना दिली आहे. पोलीस आणखी काही चित्रपट घराण्यांशी संबंधित लोकांनाही चौकशीसाठी बोलावण्याची शक्यता आहे.

सुशांतच्या त्या 4 डायऱ्यांमधून पोलिसांना मिळाली ‘ही’ महत्त्वाची माहिती

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर पोलीस सध्या त्याच्याशी संबंधीत असलेल्या प्रत्येक व्यक्तीची कसून चौकशी करत आहेत. जेणेकरून त्याच्या आत्महत्येचं नेमकं कारण शोधता येईल. ज्यात त्याच्या पर्सनल लाइफ पासून ते प्रोफेशनल लाइफमधील अनेक व्यक्तींची चौकशी केली जात आहे. अशात आता पोलिसांना आता जाणून घ्यायचं आहे की, त्याच्या शेवटच्या सिनेमाच्या शूटिंगच्या वेळी सुशांतची अवस्था काय होती. त्यासाठी पोलीस आता 'दिल बेचारा' सिनेमाची अभिनेत्री संजना सांघी हिची चौकशी करणार आहेत.

'दुसऱ्या देशात राहणं कठीण', तीन महिन्यांपासून परदेशात अडकली आहे ही अभिनेत्री

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर आता मुंबई पोलीस त्याचा शेवटच्या सिनेमातील अभिनेत्री संजना सांघी हिची चौकशी करणार आहेत. तिला सोमवारी वांद्रे पोलीस स्टेशनला चौकशीसाठी बोलवण्यात आलं आहे. मुंबई पोलिसांच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या सिनेमाची अभिनेत्री संजनाकडून पोलिसांना काही महत्त्वाची माहिती मिळू शकते. कारण सिनेमाच्या शूटिंग दरम्यान या दोघांमध्ये काही वाद झाले होते. मात्र नंतर दोघांनीही भांडण विसरुन सिनेमाचं शूट पूर्ण केलं होतं. त्यामुळे आता पोलिसांना तो वाद नेमका काय होता आणि त्याचं काही कनेक्शन सुशांतच्या आत्महत्येशी आहे का हे जाणून घ्यायचं आहे.

संपादन - अजय कौटिवार

 

First published: June 28, 2020, 10:52 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading