अभिनेत्री सौंदर्या शर्मा कोरोना व्हायरस पँडेमिकमुळे गेल्या 3 महिन्यांपासून लॉस एंजलिसमध्ये अडकली आहे. अशावेळी गरजेच्या वस्तू देखील मिळवणं तिच्यासाठी कठीण झाले आहे. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
सौंदर्यासाठी का काळ आयुष्य बदलवून टाकणारा ठरत आहे. भारतात परतण्यासाठी तिला आणखी किती वेळ जाईल याबाबत तिला काही अंदाज नाही आहे. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
सौंदर्याने अशी प्रतिक्रिया दिली आहे की, 'ही मला आयुष्यभरासाठी मिळालेली शिकवण आहे. मी इथे अडकेन असा विचारच कधी केला नव्हता.' (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
सौंदर्याने अशी माहिती दिली की ती स्टारबर्ग आणि न्यूयॉर्क फिल्म अॅकाडमीमध्ये अभिनयाच्या कोर्ससाठी परदेशात गेली होती. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
ज्यादिवशी कोरोना पँडेमिकची घोषणा झाली त्यादिवशी ती यूनिव्हर्सल स्टुडिओमध्ये शूटिंग करत होती. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
ती पुढे म्हणाली की, 'सुरुवातीला कोरोना आणि त्यानंतर इथे होणारे विरोध प्रदर्शन यामुळे परिस्थिती फार गंभीर आणि वेगळी आहे. हा एक अनुभव मी घेतला आहे आणि या काळात मला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या आहेत' . (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
'रक्तांचल'ची कहाणी 80 च्या दशकातील उत्तर प्रदेशमधील पूर्वांचलवर आधारित आहे. एमएक्स प्लेअरवर ही सीरिज प्रदर्शित करण्यात आली आहे. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)