मुंबई, 04 ऑगस्ट: आलिया भट्ट ही बॉलिवूडची सध्याची सर्वात आघाडीची आणि चर्चेत असलेली अभिनेत्री आहे. आलियानं काही दिवसांपूर्वीच तिच्या प्रेग्नंसीची बातमी चाहत्यांना दिली. आलिया भट्टची निर्मिती असलेला ‘डार्लिग्स’ हा सिनेमा 5 ऑगस्टला नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. प्रेग्नंसीमध्येही आलिया सिनेमाचं प्रमोशन करताना दिसतेय. सोशल मीडियावर मात्र ‘बायकॉट आलिया भट्ट’ अशी मागणी होत आहे. आपण पाहिलं तर मागचे काही अभिनेता आमिर खान आणि अक्षय कुमार यांना नव्या सिनेमांमुळे बायकॉट करण्याची मागणी करण्यात आली होती. हे प्रकरण सुरु असताना आता #boycottaliabhatt सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. आमिर आणि अक्षय नंतर आलिया भट्ट या हिट लिस्टमध्ये कशी काय असा प्रश्न अनेकांना पडला आहे. आलिया भट्टची पहिली वहिली निर्मिती असलेला डर्लिंग्स हा सिनेमा 5 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. सिनेमा आलियासह शेफाली शाहा प्रमुख भूमिकेत आहेत. आलिया अभिनेत्री आणि निर्माती अशा दोन्ही भूमिका सिनेमात निभावताना दिसतेय. सिनेमाचा दमदार ट्रेलर 25 जुलै रोजी प्रदर्शित करण्यात आला. डार्लिंग्सचा ड्रेलर प्रचंड संस्पेन्सनं भरलेला आहे. ट्रेलर पाहून प्रेक्षकांनी सिनेमाच्या प्रदर्शनासाठी उत्सुकता दाखवली होती. ट्रेलरमध्ये दाखवण्यात आल्याप्रमाणे अभिनेता विजय वर्मा आलियाच्या नवऱ्याची हमजा शेखची भूमिका निभावत आहे. हमजा शेख आपल्या पत्नीवर बदरुनिसावर म्हणजेच आलियावर खूप प्रेम करतो पण तो तिला सोडून निघून जातो. त्यानंतर आलियाचा खतरनाक अंदाज समोर आला. बदरुनिसा स्वत: नवरा हरवल्याची तक्रार करते. प्रत्यक्षात मात्र बदरुनिसा तिच्या नवऱ्याला डांबून ठेवते. हेही वाचा - Boycott Rakshabandhan: सिनेमा प्रदर्शनाआधीच बॉयकॉट होण्यावर व्यक्त झाला Akshay Kumar; म्हणाला…
दोन महिला मिळून एका पुरुषाला त्याच्या चुकांची कशी शिक्षा देतात याची झलक ट्रेलरमध्ये पाहायला मिळाली होती. आलिया भट्ट आणि शेफाली शाह हमजा शेखला जबरदस्त मारहाण करताना दिसल्यात. शेफाली शाहनं आलियाच्या आईची भूमिका निभावली आहे. ती मुलीला तिच्या नवऱ्याला उंदीर मारण्याचं औषध खायला घालून मारुन टाक असं सांगताना दिसतेय. सिनेमाच्या ट्रेलरला प्रेक्षकांची चांगला प्रतिसाद दिला मात्र सोशल मीडियावर सिनेमा प्रदर्शित होण्याच्या एक दिवसआधी आलिया भट्टला बायकॉट करण्याची मागणी केली जात आहे.
Believe all victims, regardless of gender. #BanDarlings #boycottAliaBhatt pic.twitter.com/fct9D4rKoA
— iAtulp (@IM_atulp) August 3, 2022
सिनेमात डोमेस्टिक वायलेंस दाखवण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. पुरुषांवर अत्याचार दाखवून कॉमेडी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आरोपी हा आरोपी असतो. त्याच्याइतका वाईट माणूस कोणीही नसतो. मात्र असा अत्याचार कोणत्या महिलेवर होतो आणि त्याचं चित्रण सिनेमात दाखवण्यात आलं तर सगळीकडे हंगामा झाला असता. मग पुरुषांच्या बाबतीत असं होत तेव्हा काय करायचं? असा प्रश्न विचारला जात आहे.
Bollywood promoting domestic violence & breakdown of families.
— Nirmal Kumar Kedia (ନିର୍ମଳ) (@kedianirmal26) August 3, 2022
Put a stop on these brainless movies. #BoycottAliaBhatt pic.twitter.com/m3b6RFGxN6
लोकांचं असं देखील म्हणणं आहे की, प्रत्येक पुरुष वाईट नसतो, प्रत्येक पुरुष महिलेला त्रास देत नाही. प्रत्यक्षात मात्र अशा अनेक महिला चर्चेत आल्या होत्या की ज्यांनी पुरुषांवर मारहाण केल्याचा खोटा आरोप करुन महिला संघटनांची मदत घेऊन त्यांचं आयुष्य खराब केलं होते. अशी अनेक उदाहरणं देत अनेकांनी बायकॉट आलिया भट्ट असा हॅशटॅग सोशल मीडियावर शेअर केला आहे.