मुंबई 1 ऑगस्ट: अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) फिल्मी करिअरपेक्षा आपल्या खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असतो. कधी मलयाकासोबतचं रिलेशन तर कधी सलमानसोबत घेतलेला पंगा. परंतु यावेळी तो अभिनेत्री जान्हवी कपूरमुळे (janhvi Kapoor) चर्चेत आहे. तो जान्हवीचा सावत्र भाऊ आहे. मात्र गेली अनेक वर्ष तो तिच्यासोबत बोलत नव्हता. मात्र श्रीदेवीच्या मृत्यूनंतर त्यांच्या नात्यातील दुरावा संपला. त्याने जान्हवीसोबत न बोलण्यामागचं कारण सांगितलं.
ट्रोलर्सनी लिसाच्या मुलांनाही नाही सोडलं; अभिनेत्रीने सणसणीत उत्तर देत केली बोलती बंद
अर्जुन कपूर हा बोनी कपूर यांची पहिली पत्नी अंशुला बोनी यांचा मुलगा आहे. तर जान्हवी आणि खुशी या दोघी दुसरी पत्नी श्रीदेवी यांच्या मुली आहेत. आपल्या आई-वडिलांच्या घटस्फोटाला श्रीदेवी जबाबदार आहे. असं तो समजत होता. त्यामुळे गेली अनेक वर्ष त्याने जान्हवी आणि खुशीसोबत कुठलंही संभाषण केलं नाही. बझार मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत अर्जुनने आपल्या करिअरवर भाष्य केलं. त्यावेळी त्याने जान्हवीसोबतच्या नात्यावर खुलासा केला.
'लव्ह आज कल'ची12 वर्षे पूर्ण; 'विश्वास बसत नाहीय..' म्हणत दीपिका पादुकोण झाली भावुक
तो म्हणाला, “आम्ही अनेकदा कौटुंबीक कार्यक्रमांमध्ये भेटायचो. परंतु आमच्यामध्ये तशी कधी चर्चा वगैरे झाली नाही. कदाचित आम्ही दोघंही एकमेकांना टाळत होतो. परंतु श्री देवी यांच्या मृत्यूनंतर मात्र परिस्थिती बदलली. जान्हवी आणि खुशी यांना मानसिक आधाराची गरज होती. आणि ती गरज मला जाणवत होती. परिणामी मोठा भाऊ म्हणून मी त्यांना तो आधार दिला. आणि पाहता पाहता आमच्या नात्यातील दुरावा संपला. आज जान्हवी मला दादा म्हणून हाक मारते. आणि ही हाक मला खुप आवडते. एखाद्या जबाबदारीची जाणीव मला या हाकेमुळे होते.”
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Arjun kapoor, Janhvi kapoor