मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /'लव्ह आज कल'ची12 वर्षे पूर्ण; 'विश्वास बसत नाहीय..' म्हणत दीपिका पादुकोण झाली भावुक

'लव्ह आज कल'ची12 वर्षे पूर्ण; 'विश्वास बसत नाहीय..' म्हणत दीपिका पादुकोण झाली भावुक

या चित्रपटात दीपिका पादुकोणसोबत अभिनेता सैफ अली खान होता. हा चित्रपट आधुनिक जगाच्या नात्यांवर आधारित होता.

या चित्रपटात दीपिका पादुकोणसोबत अभिनेता सैफ अली खान होता. हा चित्रपट आधुनिक जगाच्या नात्यांवर आधारित होता.

या चित्रपटात दीपिका पादुकोणसोबत अभिनेता सैफ अली खान होता. हा चित्रपट आधुनिक जगाच्या नात्यांवर आधारित होता.

मुंबई, 1 ऑगस्ट- बॉलिवूड अभिनेत्री (Bollywood Actress)  दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आज सर्वात यशस्वी अभिनेत्रींपैकी एक समजली जाते. तिने आपल्या प्रत्येक चित्रपटातून प्रेक्षकांचं मन जिंकल आहे. तिच्या प्रत्येक भूमिकेने चाहत्यांच्या मनावर एक विशिष्ट छाप पाडली आहे. तसेच स्वतः दीपिकासाठीही तिची प्रत्येक भूमिका खूप खास आहे. मनाच्या खूप जवळ आहे. नुकताच दीपिकाने आपल्या सोशल मीडियावर एक पोस्ट (Share Post) केली आहे. ही पोस्ट दिग्दर्शक इम्तियाज अलीच्या ‘लव्ह आज कल’ (Love AAj Kal) चित्रपटाच्या 12 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने केलेली आहे.

अभिनेत्री दीपिका पादुकोण सोशल मीडियावरसुद्धा प्रचंड लोकप्रिय आहे. तिच्या प्रत्येक पोस्टवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतं असतो. अभिनेत्रीची प्रत्येक पोस्ट चाहत्यांसाठी खुपचं खास असते. जशी ही आजची पोस्ट आहे. नुकताच अभिनेत्री दीपिका पादुकोणने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेयर केली आहे. ही पोस्ट दीपिकासाठी खुपचं खास आहे. कारण तिच्या ‘लव्ह आज कल’ या चित्रपटाला तब्बल 12 वर्षे पूर्ण झाली आहेत. इम्तियाज अली दिग्दर्शित हा चित्रपट दीपिकाच्या मनाच्या खुपचं जवळचा आहे. या चित्रपटाने मोठी प्रसिद्धीही मिळवली होती.यामध्ये दीपिकाने ‘मीरा’ नावाच्या एका बेधडक मुलीची भूमिका साकारली होती. तिच्या करीयरच्या सुरुवातीच्या दिवसातील या चित्रपटात तिच्या अभिनयाचं विशेष कौतुक झालं होतं.

(हे वाचा:दीपिकाला घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचला रणवीर; चाहते म्हणाले Good News!  )

या चित्रपटात दीपिका पादुकोणसोबत अभिनेता सैफ अली खान होता. हा चित्रपट आधुनिक जगाच्या नात्यांवर आधारित होता. दीपिकाने पोस्ट करत म्हटलं आहे, ‘मला विश्वास होतं नाहीय. की, ‘लव्ह आज कल’ने 12 वर्षे पूर्ण केलं’. दिग्दर्शक इम्तियाज अलीसोबत दीपिकाचा हा पहिलाचं चित्रपट होता. यामध्ये अभिनेत्रीला विशेष भूमिका होती.

(हे वाचा:  HBD: छोट्या पडद्यावर मिळवली प्रसिद्धी; मराठमोळी मृणाल ठाकूर अशी झाली बॉलिवूड....)

सध्या दीपिका आपल्या आगामी ‘पठाण’ या चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यग्र आहे. येत्या काळात दीपिका अनेक इंटरेस्टींग चित्रपटांमध्ये झळकणार आहे. ती साऊथ सुपरस्टार प्रभाससोबत नाग आश्विनच्या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट ‘द इंटर्न्’ वर आधारित आहे.

First published:

Tags: Bollywood actress, Deepika padukone