Home /News /entertainment /

मुख्यमंत्र्यांनी कोरोनाबाबत अभिनेते, निर्मात्यांशी साधला संवाद; नेमकं काय घडलं या बैठकीत?

मुख्यमंत्र्यांनी कोरोनाबाबत अभिनेते, निर्मात्यांशी साधला संवाद; नेमकं काय घडलं या बैठकीत?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चित्रपट तसेच मालिका निर्माते, अभिनेते यांच्याशी संवाद साधला. कोरोनाचा वाढता प्रकोप पाहता मुख्यमंत्र्यांनी त्याच विषयावर बैठक घेतली. व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे ही भेट घेण्यात आली.

  मुंबई, 4 एप्रिल : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm Uddhav thackrey)  यांनी चित्रपट तसेच मालिका निर्माते, अभिनेते यांच्याशी संवाद साधला. कोरोनाचा वाढता प्रकोप पाहता मुख्यमंत्र्यांनी त्याच विषयावर बैठक घेतली. व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (video conferencing) द्वारे ही भेट घेण्यात आली होती. निर्मात्यांनी कोरोना काळात सहकार्य कराव तसेच शासन करत असलेल्या निर्बंधांचं तसेच सुचनांचं पालन करण्यात सहकार्य कराव यासाठी विशेषता ही बैठक घेण्यात आली होती. याशिवाय निर्मात्यांनी देखील आपल्या विविध सूचना मांडून एकजुटीने शासन घेईल त्या निर्णयांना पाठिंबा असेल असे सांगण्यात आले. या बैठकीसाठी सरकारतर्फे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ प्रदीप व्यास आदी उपस्थित होते. सिनेस़ृष्टीतील अनेक महत्त्वाच्या व्यक्ती या बैठकीत सहभागी झाल्या होत्या. मनोज जोशी, डॉ. अमोल कोल्हे, सिद्धार्थ रॉय कपूर, महेश भट (Mahesh Bhatt), सुषमा शिरोमणी, मेघराज राजेभोसले, अमित बहेल, निखिल साने, दीपक राजाध्यक्ष, अजय भाळवणकर, टी पी अग्रवाल, सतीश राजवाडे, संग्राम शिर्के, अशोक दुबे, नितीन वैद्य, अशोक पंडित, अभिषेक रेगे, दीपक धर आदी सहभागी झाले होते.

  प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री शशिकला जावळकर यांचं निधन

  मुख्यमंत्र्यांनी काल वृत्तपत्र संपादक, मालकांशी ही चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनी जनतेला संबोधित करताना लॉकडाऊनला पर्याय सुचवण्याचं आवाहन केलं होतं या चर्चेदरम्यान काही पर्याय सांगण्यात आले. मुख्यमंत्र्यांनीही “लॉकडाऊन कुणालाही हवाहवासा वाटत नाही. मात्र कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ही लढाई तुम्ही आम्ही मिळून लढावी लागेल असं त्यांनी म्हचलं होतं “आपल्याला कुणाचीही रोजी रोटी हिरावून घ्यायची नाही. पण जीवांची काळजीही घ्यावीच लागणार, आपण वर्षभरापासून सातत्याने आरोग्याचे नियम पाळण्यास सांगतो आहोत. मधल्या काळात आपण ते पाळल्याने ही साथ बऱ्यापैकी आपण रोखू शकलो. मात्र आता विषाणूच्या नव्या अवतारामुळे आपल्यासमोर नवे आव्हान उभे राहिले आहे. सरकारला लॉकडाऊन करण्यास आवडत नाही. ही लढाई एकट्या सरकारची नाही तर तुम्हा आम्हा सर्वांची आहे” असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
  Published by:News Digital
  First published:

  Tags: Entertainment, Uddhav thackarey

  पुढील बातम्या