मुंबई, 21 मे: सर्वांची लाडकी अभिनेत्री ह्रता दुर्गुळेने (hruta durgule ) प्रतिक शाह (prateek shah ) सोबत ह्रता 18 मे रोजी मुंबईत लग्न केलं. ह्रताच्या लग्नाला मराठी टेलिव्हिजन क्षेत्रातील अनेक मंडळींनी हजेरी लावली होती. अभिनेत्री प्रिया बापट (Priya Bapat) ते आदिश वैद्य (Adish Vaidya) पर्यंत अनेक कलाकार उपस्थित होते. ‘फुलपाखरु’ (Phulpakhru) मालिकेची संपूर्ण टीम देखील लग्नाला हजर होती. इतकी सगळी मंडळी लग्नात होती तरी महाराष्ट्राचा चॉकलेट बॉय इंद्रा (Indra) म्हणजे अभिनेता अजिंक्य राऊत (Ajinkya Raut) मात्र कुठेही दिसला नाही. तसेच मन उडू उडू झालं ( Man Udu Udu Zhala) मालिकेतील कोणत्याही कलाकाराचे फोटो ह्रताच्या लग्नात दिसले नाहीत. अनेकांनी अजिंक्य लग्नाला आला नाही का? असा प्रश्न ह्रताच्या पोस्ट केला होता. अंजिक्य ह्रताच्या लग्नाला का जाऊ शकला नाही याच कारण आता समोर आलं आहे. अंजिक्यने एक न्यूज पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत म्हटलेय, ‘ह्रताच्या लग्नादिवशी मी परभणीला होतो. माझ्या आई वडिलांचा लग्नाचा वाढदिवस होता. मी परभणीला गेलो त्यामुळे मला लग्नाला येता आलं नाही. ‘तु ह्रताच्या साखरपुड्याला होतास आता मम्मी पप्पांच्या लग्नाचा वाढदिवसाला चल’, असं माझी बहिण सहज म्हणाली. पण मी गावी गेल्यावर मम्मी पप्पाच माझ्यावर फार रागावले. ती तुझी सहकलाकार आहे तु तिच्या लग्नाला जायला हवं होतंस, असं ते म्हणाले. हेही वाचा - Hruta Durgule Wedding: लग्नानंतर पतीसोबत ह्रता निघाली हनीमूनला, पहा तिचा पोस्ट ब्राइडल लुक
ह्रता आणि माझी फार चांगली मैत्री अजिंक्य पुढे म्हणला, मी ह्रताच्या लग्नासाठी सुट्टी घेतली होती 15-16 मे रोजी मी सुट्टी घेतली होती 17मे रोजी मी मुंबईत येऊन 18 मेला लग्नाला येणार होतो. पण मालिकेच्या प्रोडक्शन हाऊसकडून माझ्या सुट्ट्या पोस्टपोन झाल्याने मला लग्नाला हजर राहता आले नाही. त्यामुळे मी ह्रताला फोन करुन सांगितले, त्यावर ह्रता फार नम्रपणे म्हणली, ‘अजिंक्य काहीच हरकत नाही तू तुझ्या आई वडिलांसोबत सेलिब्रेट कर’. आमची मैत्री अनदर लेव्हलला आहे. त्यामुळे तिने मला समजून घेतलं. लग्नाला न गेल्याने रागवल्या ह्रताच्या सासू अजिंक्य आणि ह्रता यांच्यात फार घट्ट मैत्री आहे. तसेच ह्रताचा नवरा आणि तिची सासू अभिनेत्री मुग्धा शाह यांच्याशीही त्याचे फार चांगले संबंध आहेत. मात्र ह्रता आणि प्रतिकच्या लग्नाला न आल्याने त्या रागवल्याचं अंजिक्यने सांगितलं. अंजिक्य म्हणाला, ‘मला आताच निरोप मिळालाय ह्रताच्या सासू म्हणाल्यात, आता लग्नाला आला नाहीस ना आता ओळखही दाखवायला येऊ नकोस’. मी ह्रताच्या लग्नाला जरी हजर राहू शकलो नाही तरी तिच्या इथून पुढच्या सगळ्या सोहळ्यांमध्ये मी तिच्याबरोबर असेन. तिला काही अडचण आली तर केव्हाही आणि कधीही मी तिच्याबरोबर असेन, असं देखील अंजिक्य मुलाखतीत म्हणाला.