मुंबई, 20 मे - दुर्वा (Durva) फुलपाखरू (Phulpakharu) आणि मन उडू उडू झालं (Man Uddu Uddu Jhal) म्हणत महाराष्ट्राच्या रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी तरुणाची लाडकी क्रश म्हणजेच अभिनेत्री ह्रता दुर्गुळे (Hruta Durgule) हिंदी टेलिव्हिजन विश्वातील प्रसिद्ध दिग्दर्शक निर्माता प्रतिक शाह (prateek Shah) सोबत ह्रता 18 मे रोजी लग्नगाठ बांधली ( Hruta Durgule prateek Shah Wedding) ह्रता गपचूप केलेल्या लग्नाने तिच्या चाहत्यांना मोठं सप्राइज मिळालं. ह्रता आणि प्रतिक यांच्या लग्नाला मराठी तसेच हिंदी टेलिव्हिजन विश्वातील अनेक कलाकार आणि दिग्गजांनी हजेरी लावली होती. या नवविवाहीत दाम्पत्याला सिनेसृष्टी तसेच सर्व चाहत्यांकडून शुभाशिर्वाद मिळत आहेत. लग्नाचे सर्व विधी आटोपून अखेर ह्रता आणि प्रतिक हनिमूनला निघाले आहेत. ह्रताने स्वत: इस्टाग्रामवर पोस्ट करत ही माहिती दिली आहे.
ह्रताने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीला पती प्रतिक शाह सोबतचा सेल्फी फोटो शेअर केला आहे. "लेस्ट गो प्रतिक शाह" असे म्हणत प्रतिकला स्टोरी टॅग देखील केली आहे. दोघांचा हा फोटो मुंबई विमानतळावरील असल्याचं फोटोच्या बॅकग्राऊंडवरुन लक्षात येत आहे. दोघांच्या हातात सामान देखील दिसत आहे. या फोटोवरुन दोघे हनिमूनला निघाल्याचा अंदाज लावण्यात येत आहे. पण दोघे हनिमूनला नक्की कुठे चाललेत हे काही त्यांनी सांगितलेले नाही. त्यामुळे चाहते त्यांचं लाडकं कपल हनिमूनसाठी कुठे निघालेत हे जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत.
हेही वाचा -
VIDEO: लग्नाच्या मंडपात पोहोचताच रडू लागली हृता, अभिनेत्रीच्या लग्नातील भावुक क्षण आले समोर

ह्रताने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिचा पोस्ट वेडिंग लुक समोर आला आहे. लग्नात गोड, गोजिरी दिसणारी ह्रता लग्नानंतरही तितकीच सोज्वळ आणि क्यूट दिसत आहे. ह्रता आणि प्रतिक यांनी ट्विनिंग आऊटफिट घातले असून ह्रताने स्पेक्स guimiller फिल्टरमध्ये फोटो काढला आहे. दोघांच्या या फोटोला त्यांच्या चाहत्याकडून पसंती मिळत असून लग्नानंतर ह्रताच्या चेहऱ्यावर आलेल्या ग्लोचं चाहते कौतुक देखील करत आहेत.
ह्रता आणि प्रतिक यांनी मुंबईत लग्न केलं. त्यांच्या लग्नाला मराठी टेलिव्हिजन विश्वातील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. अभिनेत्री प्रिया बापट, उमेश कामत, सुयश टिळक, आयुषी भावे टिळक तसेच ह्रताच्या सर्वात गाजलेली मालिका म्हणजे फुलपाखरुमधील कलाकारांची संपूर्ण टीम लग्नात हजर झाली होती. इतकच नाही तर बिग बॉस फेम अभिनेता आदिश वैद्य गर्लफ्रेंड रेवतीसह ह्रताच्या लग्नात आला होता. ह्रताचे लग्नविधी, तिची लग्नमंडपातील एंट्री, मंडपात पोहोचताच भावूक झालेल्या ह्रताच्या सुंदर क्षणांचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असून सर्वांकडून ह्रता आणि प्रतिक यांच्या नव्या आयुष्यासाठी प्रेम आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.