जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / धक्कादायक! रिहर्सलच्या नावाखाली दिग्दर्शकानं केली होती ‘ही’ मागणी, बॉलिवूड अभिनेत्रीचा गौप्यस्फोट

धक्कादायक! रिहर्सलच्या नावाखाली दिग्दर्शकानं केली होती ‘ही’ मागणी, बॉलिवूड अभिनेत्रीचा गौप्यस्फोट

धक्कादायक! रिहर्सलच्या नावाखाली दिग्दर्शकानं केली होती ‘ही’ मागणी, बॉलिवूड अभिनेत्रीचा गौप्यस्फोट

सोशल मीडियावरुन सुरू झालेल्या Me Too आंदोलनानंतर बॉलिवूडधूनही अनेक अभिनेत्रींनी याबाबतचे त्यांचे अनुभव शेअर केले.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 17 सप्टेंबर : सोशल मीडियावरुन सुरू झालेल्या Me Too आंदोलनानंतर बॉलिवूडधूनही अनेक अभिनेत्रींनी याबाबतचे त्यांचे अनुभव शेअर केले. अभिनेत्री तनुश्री दत्तानं केलेल्या खुलाश्यानंतर इतर अभिनेत्रींनीही त्यांना मिळालेल्या वाईट वागणूकीबाबत सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करायला सुरुवात केली. आता या अभिनेत्रींमध्ये आणखी एका नावाचा समावेश झाला आहे. सलमान खानच्या वीर सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री झरीन खाननं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्यासोबत घडलेल्या एका घटनेचा धक्कादायक खुलासा केला आहे. पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीत झरीन खाननं इंडस्ट्रीमध्ये होत असलेल्या कास्टिंग काउचवर मोठा खुलासा केला आहे. झरीन म्हणाली, एकदा एका दिग्दर्शकानं रिहर्सलच्या बहाण्यानं त्याच्यासोबत किसिंग सीन करण्यास सांगितलं होतं. त्यावेळी मी या इंडस्ट्रीमध्ये नवखी होते. त्यावेळी एका दिग्दर्शकानं किसिंग सीनची रिहर्सल करायला सांगितलं होतं. तो मला म्हणाला, तुला तुझ्यातली भीती घालवावी लागेल आणि यासाठी त्यानं मला त्याच्यासोबत किसिंग सीन्सवर परफॉर्म करायला सांगितलं होतं. मात्र मी त्याला असं काहीही करण्यास नकार दिला. विवेक ओबेरॉयनंतर ‘हा’ प्रसिद्ध दिग्दर्शक करतोय मोदींवर नव्या सिनेमाची निर्मिती

जाहिरात

याशिवाय झरीननं कास्टिंग काउच संदर्भात आणखी एक किस्सा शेअर केला. ती म्हणाली, या इंडस्ट्रीमध्ये एका व्यक्तीनं मला म्हटलं होतं जर मी त्याच्याशी मैत्री केली तर तो तिच्या पुढच्या प्रोजेक्टमध्ये तिची मदत करेल. ‘दबंग 3 हा माझा शेवटचा सिनेमा असेल…’

काही दिवसांपूर्वी झरीनच्या एका फोटोवरुन ट्रोल करण्यात येत होतं. तिनं एक फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. ज्यामध्ये तिच्या पोटावर स्ट्रेच मार्क्स दिसत होते. म्हणून काही लोकांनी तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. झरीननं तिच्या इन्स्टा स्टोरीवर एक पोस्ट लिहित या सर्वांना चांगलीच चपराक दिली. तिनं लिहिलं, ‘ज्या लोकांना माझ्या पोटावर काय झालंय हे जाणून घेण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी मी हे लिहित आहे. हे एक अशा व्यक्तीचं पोट आहे. जिनं 50 किलो वजन कमी केलं आहे. कोणत्याही फोटोशॉप किंवा सर्जरीशिवाय ते असं दिसतं. मी एक अशी व्यक्ती आहे जी वास्तव जगात जगण्याचा प्रयत्न करते आणि त्यावरच विश्वास ठेवते.’ …अन् रणवीर सिंहची पत्नी असल्याचं सांगायला विसरली दीपिका पदुकोण ================================================ VIDEO: पंतप्रधान मोदींच्या हस्ते फुलपाखरू उद्यानाचं उद्घाटन

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात