जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / ‘तुझे चित्रपट कोणी पाहणार नाही’; नव्या Videoमुळे रिया चक्रवर्ती ट्रोल

‘तुझे चित्रपट कोणी पाहणार नाही’; नव्या Videoमुळे रिया चक्रवर्ती ट्रोल

‘तुझे चित्रपट कोणी पाहणार नाही’; नव्या Videoमुळे रिया चक्रवर्ती ट्रोल

“इमेज सुधारण्याचे खोटे प्रयत्न बंद कर तुझे चित्रपट आता कोणीही पाहणार नाही.” अशा आशयाच्या प्रतिक्रिया देत तिला ट्रोल केलं जात आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 4 जुलै**:** बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) सध्या प्रचंड चर्चेत आहे. सुशांतची आत्महत्या आणि बॉलिवूड ड्रग्ज प्रकरण यामुळे देशभरातील लोकांचं लक्ष तिच्याकडे लागून आहे. तिच्याबाबत आलेल्या लहानतल्या लहान अपडेटवर देखील लोक प्रतिक्रिया देताना दिसतात. यावेळी रियानं इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला. (Rhea Chakraborty video) मात्र यावरुन देखील तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. (Rhea Chakraborty trolled) “इमेज सुधारण्याचे खोटे प्रयत्न बंद कर तुझे चित्रपट आता कोणीही पाहणार नाही.” अशा आशयाच्या प्रतिक्रिया देत तिला ट्रोल केलं जात आहे. रियानं इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती कुत्र्यांना बिस्किट भरवताना दिसत आहे. माझं यांच्यावर खूप प्रेम आहे अशी कॅप्शन तिनं या व्हिडीओवर दिलं आहे. मात्र हा व्हिडीओ आणि ते कॅप्शन पाहून काही नेटकरी तिच्यावर संतापले. “प्राण्यांवर प्रेम करणारी माणसांना मात्र फसवते.”, “इमेज सुधारण्याचे खोटे प्रयत्न बंद कर तुझे चित्रपट आता कोणीही पाहणार नाही.” अशा आशयाच्या प्रतिक्रिया देत काही ट्रोलर्सने तिच्यावर टीका केली आहे. ‘मला फरक पडत नाही, कारण..’; आमिरसोबतच्या लिंकअपवर फातिमानं दिलं असं प्रत्युत्तर

जाहिरात

प्रसिद्ध अभिनेत्रीने काँग्रेस नेत्यासोबत तोडलं नातं; 3 महिन्यांपूर्वीच केला होता भव्य साखरपुडा सुशांतनं 14 जून 2020 रोजी आत्महत्या केली होती. त्याच्या मृत्यूला आज एक वर्ष उलटून गेलं आहे. मात्र मृत्यूमागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. हे प्रकरण दिवसेंदिवस आणखीनच गुंतत चाललं आहे. आधी मुंबई पोलीस, मग इन्कम टॅक्स, पुढे सीबीआय आणि आता NCB द्वारे या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. या प्रकरणात सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती ही संशयीत आरोपी आहे. तिनं आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी सुशांतला ड्रग्स देऊन आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केलं होतं असे आरोप तिच्यावर करण्यात आले आहेत. शिवाय ड्रग्ज प्रकरणी तिला अटकही करण्यात आली होती. गेल्या कित्येक महिन्यांपासून तिची चौकशी सुरु आहे. या चौकशीत तिनं अनेक बॉलिवूड अभिनेत्रींची नावं घेतली. सध्या तिनं केलेल्या दाव्यांची उलट तपासणी केली जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात