Home /News /entertainment /

‘मला फरक पडत नाही, कारण..’; आमिरसोबतच्या लिंकअपवर फातिमानं दिलं असं प्रत्युत्तर

‘मला फरक पडत नाही, कारण..’; आमिरसोबतच्या लिंकअपवर फातिमानं दिलं असं प्रत्युत्तर

या घटस्फोटासाठी काही नेटकऱ्यांनी अभिनेत्री फातिमा सना शेख (Fatima Sana Shaikh) हिला जबाबदार धरलं आहे. या प्रकरणी तिला ट्रोल देखील करण्यात आलं.

    मुंबई 4 जुलै: आमिर खान (Aamir Khan) आणि किरण राव (Kiran Rao) यांच्याकडे बॉलिवूडमधील सर्वात परफेक्ट कपल म्हणून पाहिलं जात होतं. आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर आमिरनं जवळपास 15 वर्ष किरणसोबत संसार केला. परंतु अखेर हा 15 वर्षांचा संसार मोडला. (Aamir khan kiran rao divorce) कारण दोघांनीही घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. आमिर आणि किरण यांनी एक जॉइंट स्टेटमेंट जारी करत ही धक्कादायक माहिती आपल्या चाहत्यांना दिली. लक्षवेधी बाब म्हणजे या घटस्फोटासाठी काही नेटकऱ्यांनी अभिनेत्री फातिमा सना शेख (Fatima Sana Shaikh) हिला जबाबदार धरलं आहे. या प्रकरणी तिला ट्रोल देखील करण्यात आलं. उमेश कामतनं 8 वर्ष का केलं नाही कुठल्याही मालिकेत काम? सांगितलं खरं कारण खरं तर हे ट्रोलिंग तिच्यासोबत पहिल्यांदा झालेलं नाही. यापूर्वी देखील आमिरमुळे तिच्यावर टीका करण्यात आली होती. पाहूया त्यावेळी या ट्रोलिंगवर तिनं काय प्रत्युत्तर दिलं होतं? आईमुळे झालं होतं नीना गुप्तांचं पहिलं ब्रेकअप; बसला होता जोरदार मार “सुरुवातीला या ट्रोलिंगला मला भयंकर त्रास व्हायचा. आजपर्यंत इतक्या मोठ्या स्थरावर माझी कोणी निंदा केली नव्हती. एका असा गट ज्यांनी तुम्हाला कधी पाहिलेलं नाही. ज्यांना तुम्ही ओळखत नाही. ते तुमच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल वाट्टेल ते बोलतात. यामुळे खूप दु:ख व्हायचं. पण हळूहळू मी त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यास सुरुवात केली. अन् आता तर मला काहीच फरक पडत नाही. कारण केवळ मीच नाही तर जगातील प्रत्येक मोठ्या कालाकारावर अशा प्रकारची टीका केली जाते. त्यामुळं उगाच त्रास करून आयुष्य कशाला खराब करायचं?” फिल्म फेअरला दिलेल्या मुलाखतीत फातिमानं असं प्रत्युत्तर दिलं होतं.
    Published by:Mandar Gurav
    First published:

    Tags: Aamir khan, Entertainment, Love story

    पुढील बातम्या