कोण आहे ही मरीना कुंवर? जिच्या VIDEO ची सोनू निगमने भूषण कुमारला दिली धमकी

कोण आहे ही मरीना कुंवर? जिच्या VIDEO ची सोनू निगमने भूषण कुमारला दिली धमकी

माझ्याशी पंगा घेतला तर मरीना कुंवरचा (marina kunwar) तो व्हिडीओ आपल्या YouTube वर टाकेन, अशी धमकी गायक सोनू निगमने (sonu nigam) भूषण कुमारला (bhushan kumar) व्हिडीओतून दिली आहे.

  • Share this:

मुंबई, 22 जून : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) आत्महत्येनंतर बॉलीवूडमधील माफियांबाबत चर्चा रंगू लागली. यानंतर प्रतिक्रिया देताना संगीत क्षेत्रातही माफिया असल्याचं गायक सोनू निगमने म्हटलं होतं. त्यानंतर आता सोनू निगमने थेट टी-सीरीज (T-Series) कंपनीचा मालक भूषण कुमारवर (Bhushan Kumar) निशाणा साधला आहे. मॉडेल मरीना कुंवरचं (marina kunwar) नाव घेत सोनू निगमने भूषण कुमारला (bhushan kumar) धमकी दिली आहे.

'माझ्याशी पंगा घेतला तर मरीना कुंवरचा तो व्हिडीओ आपल्या YouTube वर टाकेन', अशी धमकी सोनू निगमने भूषण कुमारला व्हिडीओतून दिली आहे. ही मरीना कुंवर नेमकी आहे कोण आणि तिचा भूषण कुमारशी काय संबंध आहे? तिचा कोणता व्हिडीओ टाकून भूषण कुमारला एक्सपोझ करण्याची धमकी सोनू निगम देत आहे? तर ही आहे ती मरीना कुंवर जी एक मॉडेल आणि टीव्ही अभिनेत्री आहे.

मरीना जिंदगी 'जिंदगी तुमसे', 'जग्‍गू दादा', 'शपथ', 'सीआईडी' आणि 'आहट' सारख्या सीरिअल्समध्ये दिसून आली होती.

2018 साली ती सर्वात जास्त चर्चेत आली जेव्हा तिने दिग्दर्शक साजिद खान आणि भूषण कुमारवर आपलं शोषण केल्याचा आरोप केला होता. #MeToo मोहिमेअंतर्गत मरीनाने आजतकला दिलेल्या एका मुलाखतीत आरोप केले होते की, भूषण कुमारने व्हिडीओत काम देण्याच्या नावाखाली आपल्या घरी बोलावलं आणि गैरवर्तणूक करण्याचा प्रयत्न केला होता.

हे वाचा - सोनू निगमची भूषण कुमारला धमकी; 'मरीना कुंवरचा तो व्हिडीओ YouTube वर टाकेन'

गायक सोनू निगमने मरिनाचा तो व्हिडीओ यूट्युबवर टाकण्याची धमकी भूषण कुमारला दिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonu Nigam (@sonunigamofficial) on

सोनू निगमने या व्हिडीओत म्हटलं आहे, "भूषण कुमार आता तर तुझं नाव मला घ्यावंच लागेल आणि आता तू 'तू'च्या लायकीचाच आहेस. तू चुकीच्या व्यक्तीशी पंगा घेतला आहेस. ती वेळ विसरलास का जेव्हा तू माझ्या घरी आला होतास... जेव्हा तू मला म्हणाला होतास, भावा माझा अल्बम कर... भावा दिवाना कर... भावा मला सहाराश्रींना भेटवून दे... स्मिता ठाकरेंना भेटवून दे... बाळासाहेब ठाकरेंना भेटवून दे... मला अबू सालेमपासून वाचव...माहिती आहे ना हे? मी तुला सांगतो आता तू माझ्या नादाला लागू नकोस"

हे वाचा - "मी तुमची पॉवर काढून घेतली", ट्विटर एक्झिटनंतर सोनाक्षीचं ट्रोलर्सना उत्तर

"मरीना कुंवर लक्षात आहे ना? ती काय बोलली आणि का बॅकआऊट झाली? हे मला माहिती नाही, मीडियाला माहिती आहे. माफिया असंच काम करतो. तिचा व्हिडीओ अजूनही माझ्याकडे आहे. जर आता तू माझ्याशी पंगा घेतलास तर तिचा व्हिडीओ मी माझ्या यूट्युब चॅनेलवर टाकेन. माझ्या नादी लागू नकोस", असं सोनू निगम म्हणाला.

संपादन - प्रिया लाड

हे वाचा - सुशांतच्या आत्महत्येनंतर आता ट्विटरवर #BoycottKhans ट्रेंड, काय आहे कारण

First published: June 22, 2020, 9:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading