मुंबई, 22 जून : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) आत्महत्येनंतर संगीत क्षेत्रातूनही आत्महत्येची बातमी येऊ शकते, असं म्हणत गायक सोनू निगम (Sonu Nigam) याने सर्वांनाच धक्का दिला होता. त्यानंतर आता सोनू निगमने थेट टी-सीरीज (T-Series) कंपनीचा मालक भूषण कुमारवर (Bhushan Kumar) निशाणा साधला आहे. मॉडेल मरीना कुंवरचं नाव घेत सोनू निगमने भूषण कुमार यांना धमकी दिली आहे. सोनू निगमने आपल्या आधीच्या व्हिडीओत संगीत क्षेत्रातही माफिया आहेत, हे सांगितलं होतं. तर नव्या व्हिडीओत त्याने आता थेट भूषण कुमार यांचं नाव घेतलं आहे. माझ्याशी पंगा घेतला तर मरीना कुंवरचा तो व्हिडीओ आपल्या YouTube वर टाकेन, अशी धमकी सोनू निगमने भूषण कुमारला दिली आहे.
सोनू निगम म्हणाला, “लातों के भूत बातोंसे नहीं मानते. मी कुणाचं नाव घेतलं नव्हतं आणि तुम्ही लोकं नव्या लोकांसह प्रेमाने राहा असं प्रेमाने म्हणालो होतो. आत्महत्या झाल्यानंतर रडण्यापेक्षा आधीच परिस्थिती सुधारणं चांगलं आहे. मात्र माफिया आहेत, ते माफियाप्रमाणेच काम करणार. मग त्यांनी सहा महान व्यक्तींना माझ्याविरोधात मुलाखत देण्यास सांगितलं. मी कुणाचं नाव घेतलं नव्हतं. मात्र माझ नाव घेतलं जातं आहे” हे वाचा - “मी तुमची पॉवर काढून घेतली”, ट्विटर एक्झिटनंतर सोनाक्षीचं ट्रोलर्सना उत्तर सोनू निगमने पुढे थेट भूषण कुमार यांचं नाव घेतलं आहे, “भूषण कुमार आता तर तुझं नाव मला घ्यावंच लागेल आणि आता तू ‘तू’च्या लायकीचाच आहेस. तू चुकीच्या व्यक्तीशी पंगा घेतला आहेस. ती वेळ विसरलास का जेव्हा तू माझ्या घरी आला होतास… जेव्हा तू मला म्हणाला होतास, भावा माझा अल्बम कर… भावा दिवाना कर… भावा मला सहाराश्रींना भेटवून दे… स्मिता ठाकरेंना भेटवून दे… बाळासाहेब ठाकरेंना भेटवून दे… मला अबू सालेमपासून वाचव…माहिती आहे ना हे? मी तुला सांगतो आता तू माझ्या नादाला लागू नकोस” हे वाचा - संगीत क्षेत्रातूनही लवकरच आत्महत्येचं वृत्त येऊ शकतं समोर; गायक सोनू निगमचा धक्कादायक खुलासा “मरीना कुंवर लक्षात आहे ना? ती काय बोलली आणि का बॅकआऊट झाली? हे मला माहिती नाही, मीडियाला माहिती आहे. माफिया असंच काम करतो. तिचा व्हिडीओ अजूनही माझ्याकडे आहे. जर आता तू माझ्याशी पंगा घेतलास तर तिचा व्हिडीओ मी माझ्या यूट्युब चॅनेलवर टाकेन. माझ्या नादी लागू नकोस”, असं सोनू निगम म्हणाला. संपादन - प्रिया लाड