सुशांतच्या आत्महत्येनंतर आता ट्विटरवर #BoycottKhans ट्रेंड, काय आहे कारण

सुशांतच्या आत्महत्येनंतर आता ट्विटरवर #BoycottKhans ट्रेंड, काय आहे कारण

मागच्या काही दिवसांत सलमान-शाहरुख यांचे सोशल मीडिया फॉलोअर्स कमी झाले आहेत. अशातच आता ट्विटरवर #BoycottKhans टॉप ट्रेंडमध्ये दिसत आहे.

  • Share this:

मुंबई, 22 जून : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या(Sushant Singh Rajput) निधनानं त्याच्या कुटुंबीयांसोबतच चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे. 14 जूनला सुशांतनं मुंबईतल्या त्याच्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. त्यानंतर बॉलिवूडमधील घराणेशाहीच्या मुद्द्यावरून सोशल मीडियावर बरेच वाद सुरू आहे. ज्यात सुशांतच्या आत्महत्येला सलमान खान(Salman Khan) आणि करण जोहर (Karan Johar) यांना जबाबदार धरलं जात आहे. सोशल मीडियाच्या माध्यामातून या दोघांवर टीका होत आहे एवढंच नाही तर त्यांच्या फॉलोअर्सच्या संख्येतही मोठ्या प्रमाणावर घट होताना दिसत आहे. अशातच आता ट्विटरवर #BoycottKhans टॉप ट्रेंडमध्ये दिसत आहे.

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील घरणेशाहीचा मुद्दा प्रचंड वादात सापडला आहे. स्टार किड्ससोबतच करण जोहर आणि सलमान खान सारख्या प्रसिद्ध सेलिब्रेटींवर टीका केली जात आहे. अनेकांनी तर सलमान, शाहरूख आणि आमिर या तिघांनीही बॉलिवूडमधून बॉयकॉट करण्याची मागणी केली आहे. मात्र काहींनी अद्याप सलमान-शाहरुख यांना पाठिंबा दिला आहे आणि यावरूनच सुशांतचे चाहते आणि सलमान-शाहरुख यांचे चाहते यांच्यात ट्विटर वॉर सुरू आहे. त्यामुळेच आता ट्विटरवर #BoycottKhans टॉप ट्रेंडमध्ये दिसत आहे.

दरम्यान, सुशांतच्या आत्महत्येनंतर करण जोहर आणि सलमान खान या दोघांविरोधात एक ऑनलाईन पिटिशन देखील सुरु करण्यात आली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे सलमान खान आणि करण जोहरला धडा शिकवण्यासाठी लाखो लोकांनी त्यावर नोंदणी केली आहे.

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. 14 जूनला सुशांतनं त्याच्या मुंबईतल्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. करिअरच्या सुरुवातीच्या काळत त्यानं बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम केलं होतं. सुशांतनं त्याच्या अभिनय करिअरची सुरुवात 2009 मध्ये पवित्र रिश्ता या मालिकेतून केली होती. त्यानंतर 2013 मध्ये 'काय पो छे' या सिनेमातून त्यानं बॉलिवूड पदार्पण केलं. त्यानंतर त्यानं ‘शुद्ध देसी रोमांस', ‘एम एस धोनी : द अनटोल्ड स्टोरी', ‘राबता', ‘केदारनाथ' और ‘सोनचिड़िया' या सारख्या सिनेमात काम केलं.

First published: June 22, 2020, 1:11 PM IST

ताज्या बातम्या