Home /News /entertainment /

मनोज वाजपेयीच्या खऱ्या आयुष्यात कोण आहे चेल्लम सर? नाव ऐकून व्हाल चकित

मनोज वाजपेयीच्या खऱ्या आयुष्यात कोण आहे चेल्लम सर? नाव ऐकून व्हाल चकित

श्रीकांत तिवारीला कुठल्याही मदतीची गरज असते चेल्लम सर त्याच्या मदतीला हजर असतात. पण मनोजच्या खऱ्या आयुष्यातील चेल्लम सर कोण आहेत? (who is chellam in family man)

    मुंबई 20 जून: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता मनोज वाजपेयी (Manoj Bajpayee) हा सध्या द फॅमेली मॅन (The Family Man) या वेब सीरिजमुळं चर्चेत आहे. जबरदस्त कथानक, अभिनय आणि अफलातून व्यक्तिरेखा यामुळं ही सीरिज सुपरहिट ठरली. सीरिजमधील प्रत्येक पात्र जबरदस्त आहे. परंतु प्रेक्षकांचं खरं लक्ष वेधून घेतलं ते चेल्लम सर या व्यक्तिरेखेनं. जेव्हा कधी सीरिजमध्ये श्रीकांत तिवारीला कुठल्याही मदतीची गरज असते चेल्लम सर त्याच्या मदतीला हजर असतात. पण मनोजच्या खऱ्या आयुष्यातील चेल्लम सर कोण आहेत? (who is chellam in family man) कराटे चँम्पियन कशी झाली अभिनेत्री? पाहा ग्लॅमरस नीतूचा थक्क करणारा प्रवास मनोजनं द फॅमेली मॅनच्या निमित्तानं स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीत आपल्या करिअरवर भाष्य केलं. त्यावेळी त्यानं आपल्या खऱ्या आयुष्यातील चेल्लम सरांचं नाव सांगितलं. तो म्हणाला, “माझ्या आयुष्यात असे अनेक चेल्लम सर होऊन गेले. ज्यांचं माझ्यावर खूप प्रेम आहे. नीरज पांडे, अभिषेक चौबे, राज, डीके, अनुराग कश्यप हे असे लोक आहेत जे कायम माझ्या मदतीला हजर असतात. कधीही फोन करुन मी त्यांच्याकडे मदत मागू शकतो. हे माझ्या आयुष्यातील खरे चेल्लम सर आहेत.” ‘सेटिंग करुन 4 नॅशनल अवॉर्ड मिळवले’; अभिनेत्याचा कंगना रणौतवर मोठा आरोप कोण आहे चेल्लम सर? सीरिजमध्ये श्रीकांत तिवारीच्या मित्राचं (मदतनीस) नाव चेल्लम सर असं आहे. तो एक निवृत्त झालेला डिटेक्टिव्ह आहे. जेव्हा कधी श्रीकांतला मदतीची गरज भासते तेव्हा तो कायम धावून येतो. त्याला त्यांच्या कामात मार्गदर्शन करतो. ही व्यक्तिरेखा अभिनेता उदय महेश यानं साकारली आहे. अत्यंत कमी वेळासाठी येणारी ही व्यक्तिरेखा सध्या प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरलेली दिसत आहे.
    Published by:Mandar Gurav
    First published:

    Tags: Entertainment, Manoj Bajpayee

    पुढील बातम्या