जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / ‘सेटिंग करुन 4 नॅशनल अवॉर्ड मिळवले’; अभिनेत्याचा कंगना रणौतवर मोठा आरोप

‘सेटिंग करुन 4 नॅशनल अवॉर्ड मिळवले’; अभिनेत्याचा कंगना रणौतवर मोठा आरोप

‘सेटिंग करुन 4 नॅशनल अवॉर्ड मिळवले’; अभिनेत्याचा कंगना रणौतवर मोठा आरोप

मी 12 नापास पण द्वेष पसरवण्यात PHD; पासपोर्ट प्रकरणावरुन अभिनेत्यानं उडवली कंगना रणौतची खिल्ली

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 19 जून**:** कमाल आर खान (Kamaal R. Khan) उर्फ केआरके आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळं नेहमीच चर्चेत असतो. बॉलिवूडमधील कलाकारांवर तो कायमच टीका करताना दिसतो. सोशल मीडिया पोस्टद्वारे तो अनेक कलाकारांची पोल खोलताना दिसतो. यावेळी त्यानं बॉलिवूडची क्वीन कंगना रणौतशी (Kangana Ranaut) पंगा घेतला आहे. त्यानं कंगनाच्या पासपोर्ट प्रकरणाचं निमित्त साधून तिच्यावर जोरदार टोलेबाजी केली आहे. 12 वी नापास असलेली ही बाई द्वेष करण्यात पीएचडी आहे असं म्हणत केआरकेनं तिची खिल्ली उडवली आहे. केआरकेने एक भला मोठा व्हिडीओ शेअर करत कंगना रणौतची फिरकी घेतली आहे. त्यानं हा व्हिडीओ आपल्या यूट्यूब चॅनलवर शेअर केला आहे. “मी कंगना रणौत 12 वी नापास, समाजात द्वेष पसरवण्यात मी पीएचडी केली आहे. माला चार राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. असं असताना देखील तुम्ही माझा पासपोर्ट रिन्यू केला नाही? का तर माझ्यावर देशद्रोहाचा आरोप आहे म्हणून. हे पाहा मला देशाबाहेर शूटिंगला जायचं आहे. कारण मला पैसे देखील कमवायचे आहेत. तुम्ही बॉलिवूडच्या क्वीनचा राग अजून पाहिला नाहिये.” असं म्हणत केआरकेने या व्हिडीओमध्ये कंगनाची नक्कल केली. या व्हिडीओद्वारे त्यानं तिची यथेच्च खिल्ली उडवली आहे. शिवाय सेटिंग लावून तिनं चार राष्ट्रीय पुरस्कार मिळवले असे आरोप देखील त्यानं केले आहेत. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. भारतीय अभिनेत्रीसाठी जगातील सर्वात श्रीमंत बिझनसमॅन झाला फोटोग्राफर; क्लिक केले ग्लॅमरस फोटो

लग्न केल्याचा काजल अग्रवालला जबर फटका?, मानधनाच्या किंमतीत केली कपात काय आहे कंगना रणौतचं पासपोर्ट प्रकरण? कंगना रणौतला ‘धाडक’ सिनेमाच्या शूटिंगसाठी हंगेरी देशात जायचं होतं. मात्र कंगनाचा पासपोर्ट सप्टेंबरपर्यंतच वैध असल्याने तिने पासपोर्ट प्राधिकरणात रिन्यूअल अर्ज केला. मात्र कंगनावर देशद्रोहाचा गुन्हा असल्याने कंगनाचा पासपोर्ट रिन्यू करण्यास प्राधिकरणाने नकार दिला. त्यानंतर कंगनाने पासपोर्ट रिन्यूअल करण्यात यावा यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र तिथेही तिच्या पदरी निराशा पडली. न्यायालयाने कंगनाला फटकारत सुनावणी 25 जूनला पुढे ढकलली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात