‘गरम मसाला’, ‘ट्रॅफिक सिग्नल’, ‘13 बी’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारणारी नीतू चंद्रा (Neetu Chandra) ही बॉलिवूडमधील एक अष्टपैलू अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. बॉलिवूडसोबतच (Bollywood) तिनं दाक्षिणात्य आणि भोजपूरी सिनेसृष्टीतही काम केलं आहे.
नीतूचा आज वाढदिवस आहे. 37 व्या वाढदिवसाच्या निमित्तानं देशभरातील चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
तिचा जन्म 1984 साली पटनामधील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता. तिनं दिल्ली विद्यापिठातून आपलं शिक्षण पुर्ण केलं. शिकत असतानाच तिचं लक्ष मॉडलिंगकडे वळलं अन् तिथून तिची सिनेसृष्टीत एण्ट्री झाली.
नीतू अभिनेत्री तर आहेच पण सोबतच एक कराटे चँपियन देखील आहे. 1997 साली झालेल्या ऑल इंडिया तायक्वांडो चँपियन स्पर्धेत तिनं भारतासाठी सुवर्णपदक पटकावलं होतं.
नीतूनं 2005 साली अक्षय कुमारच्या गरम मसाला या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. चित्रपटांसोबतच ती आपल्या खासगी आयुष्यामुळं देखील कायम चर्चेत असते.
काही वर्षांपूर्वी ती पाकिस्तानी क्रिकेटपटू महम्मद आसिफला देखील डेट करत होती. आसिफ मॅच फिक्सिंगमध्ये अडकला तेव्हा त्यांचं ब्रेकअप झालं असं म्हणतात.
नीतू आता हॉलिवूड चित्रपटांमध्ये देखील झळकणार आहे. तिनं हॉलिवूडमध्ये तीन बिग बजेट चित्रपट साईन केले आहेत. यापैकी नेव्हर बॅक डाऊन हा चित्रपट येत्या जुलै महिन्यात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटासाठी नीतू प्रचंड उत्सुक आहे.
नीतू आता हॉलिवूड चित्रपटांमध्ये देखील झळकणार आहे. तिनं हॉलिवूडमध्ये तीन बिग बजेट चित्रपट साईन केले आहेत. यापैकी नेव्हर बॅक डाऊन हा चित्रपट येत्या जुलै महिन्यात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटासाठी नीतू प्रचंड उत्सुक आहे.