जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Ira Khan : कोण आहे आमीर खानचा होणारा मराठमोळा जावई नुपूर शिखरे? ज्याची होतेय तुफान चर्चा

Ira Khan : कोण आहे आमीर खानचा होणारा मराठमोळा जावई नुपूर शिखरे? ज्याची होतेय तुफान चर्चा

आमिर खानचा जावई आहे कोण?

आमिर खानचा जावई आहे कोण?

आमीर खानचा होणारा जावई नुपूर शिखरे नेमका कोण आहे, याबद्दल जाणून घेऊयात.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 23 सप्टेंबर:  मिस्टर परफेक्शनिस्ट अभिनेता आमीर खानची मुलगी इरा खान आणि तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरे यांनी त्यांच्या एंगेजमेंटची घोषणा केली आहे. दोघांवर सध्या मित्र आणि चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. दोन वर्षांहून अधिक काळापासून एकत्र असलेल्या या कपलने आता अधिकृतरित्या एंगेजमेंट केली आहे. दोघांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये नुपूर इराला प्रपोज करताना दिसतोय. नुपूरने प्रपोज करताच इराने त्याला होकार दिला. दरम्यान, आमीर खानचा होणारा जावई नुपूर शिखरे नेमका कोण आहे, याबद्दल जाणून घेऊयात. फर्स्ट पोस्टने या संदर्भात वृत्त दिलंय. मराठमोळ्या नुपूरचा जन्म 17 ऑक्टोबर 1985 रोजी पुण्यात झाला. एस. डी. कटारिया हायस्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने मुंबईतील आर. ए. पोद्दार कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्समधून डिग्री पूर्ण केली. तो हिंदू कुटुंबातील असून त्याची आई प्रीतम शिखरे या डान्स टिचर आहेत.

    नुपूर प्रोफेशनल सेलिब्रिटी ट्रेनर

    नुपूर हा प्रोफेशनल सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर आहे आणि काही काळापासून तो इराला ट्रेनिंग देत आहे. दोघेही 2020 मध्ये रिलेशनशिपमध्ये आले, तेव्हापासून ते त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एकमेकांबरोबरचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात. दोघांनी कधीच आपलं नातं जगापासून लपवलं नाही. नुपूर गेली अनेक वर्षे इराच्या पार्टी आणि वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये असतो.

    हेही वाचा - Ira Khan:आमिर खानच्या लेकीला बॉयफ्रेंडने केलं हटके प्रपोज; मग घातली अंगठी,पाहा VIDEO

    आमीर आणि सुष्मिताचा ट्रेनर

    सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर असलेल्या नुपूरने इरा व्यतिरिक्त तिचे वडील आणि बॉलिवूड अभिनेता आमीर खानलादेखील ट्रेनिंग दिल्याची माहिती आहे. इतकंच नाही तर नुपूरने अभिनेत्री सुष्मिता सेनला (Sushmita Sen ) एक दशकाहून अधिक काळ ट्रेनिंग दिलं आहे. नुपूरने सुष्मिताच्या वाढदिवसाला तिच्याबरोबरचा एक फोटो शेअर करत शुभेच्छा दिल्या होत्या.

    डान्स आणि टेनिसचा चाहता आहे नुपूर

    केवळ फिटनेस ट्रेनरच नाही तर नुपूर डान्सदेखील उत्तम करतो. त्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर टायगर श्रॉफ आणि ऋतिक रोशनच्या वॉर चित्रपटामधील ‘जय जय शिव शंकर’ या गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. एवढंच नाही तर त्याने 2014मध्ये आयर्नमॅन 70.3 वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये (World Championship) भाग घेतला होता आणि तो राज्यस्तरीय टेनिसपटूही होता. अल्टिमेट बीस्टमास्टर सीझन 2 स्पर्धेतही तो सहभागी झाला होता. सध्या नुपूर आणि इरा यांनी त्यांच्या एंगेजमेंटची घोषणा केली आहे. दोघांचा प्रपोजल व्हिडिओ व्हायरल होत असून, त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात