मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Ira Khan:आमिर खानच्या लेकीला बॉयफ्रेंडने केलं हटके प्रपोज; मग घातली अंगठी,पाहा VIDEO

Ira Khan:आमिर खानच्या लेकीला बॉयफ्रेंडने केलं हटके प्रपोज; मग घातली अंगठी,पाहा VIDEO

बॉलिवूड कलाकारां इतकेच किंबहुना त्यांच्यापेक्षाही जास्त सध्या स्टारकिड्स चर्चेत असतात. यामध्ये शाहरुख खानची लेक सुहानापासून आमिरची लेक आयराचा समावेश होतो.

बॉलिवूड कलाकारां इतकेच किंबहुना त्यांच्यापेक्षाही जास्त सध्या स्टारकिड्स चर्चेत असतात. यामध्ये शाहरुख खानची लेक सुहानापासून आमिरची लेक आयराचा समावेश होतो.

बॉलिवूड कलाकारां इतकेच किंबहुना त्यांच्यापेक्षाही जास्त सध्या स्टारकिड्स चर्चेत असतात. यामध्ये शाहरुख खानची लेक सुहानापासून आमिरची लेक आयराचा समावेश होतो.

  • Published by:  Aiman Desai
मुंबई, 23 सप्टेंबर-   बॉलिवूड कलाकारां इतकेच किंबहुना त्यांच्यापेक्षाही जास्त सध्या स्टारकिड्स चर्चेत असतात. यामध्ये शाहरुख खानची लेक सुहानापासून आमिरची लेक आयराचा समावेश होतो. आयर बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलेलं नाहीय तरीसुद्धा सोशल मीडियावर ती तुफान लोकप्रिय आहे. तिचे लाखो फॉलोअर्स आहेत. आयरा आपल्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा आपल्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत असते. ती सतत आपल्या बॉयफ्रेंडसोबत दिसून येते. हे दोघेही सतत इतर कपल्सना कपल गोल देत असतात. आमिर खानची लेक आयरा खान सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत आपल्या बॉयफ्रेंड नुपूर शिखरसोबतचे फोटो आणि व्हिडीओ बिनधास्त करत असते. ती बॉयफ्रेंड नुपूर शिखरसोबत सुंदर क्षण घालवताना दिसते. ती सिने सृष्टीत सक्रिय नाही, तरीही तिची लोकप्रियता एखाद्या सिनेस्टारपेक्षा कमी नाही. ती एक अशी व्यक्ती आणि स्टारकिड आहे जिला आपल्या आयुष्यात काय चाललं आहे ते तिला चाहत्यांसोबत शेअर करायला आवडतं. नुकतंच आयरा खानने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक सुंदर व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखर तिला प्रपोज करताना दिसत आहे. हा व्हिडिओ एका इव्हेंटचा आहे, जिथे नुपूर लोकांच्या गर्दीसमोर आयराला किस करतो, मग गुडघ्यावर बसून अगदी फिल्मी अंदाजात तिला प्रपोज करतो. हा व्हिडीओ सध्या प्रचंड चर्चेत आहे. युजर्स या व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंट्स करुन आमिर खानच्या लेकीवर शुभेच्छांचा आणि प्रेमाचा वर्षाव करत आहेत.
View this post on Instagram

A post shared by Ira Khan (@khan.ira)

(हे वाचा:Koffee With Karan 7: शाहरुख खानच्या 'या' वाईट सवयींपासून मुलांना दूर ठेवते पत्नी गौरी; वाचून तुम्हालाही वाटेल आश्चर्य ) शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये आयरा खूप आनंदी दिसत आहे. ती अंगठी घालण्यासाठी लगेच हात पुढे करते. दोघे पुन्हा एकदा एकमेकांना किस करत आपलं नातं कन्फर्म करतात. आयरा आणि नुपूर गेल्या दोन वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. या वर्षी जूनमध्ये त्यांनी आपल्या दोन वर्षाच्या नात्याचं सेलिब्रेशन केलं होतं. यावेळी आमिर खानच्या लेकीने काही व्हिडीओ आणि फोटो शेअर करत इमोशल पोस्टदेखील लिहली होती. आयर नेहमीच बिनधास्तपणे नुपूरसोबतचे रोमँटिक व्हिडीओ आणि फोटो शेअर करत असते.
First published:

Tags: Aamir khan, Bollywood News, Entertainment

पुढील बातम्या