मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

KBC13 मध्ये हिमानी बुंदेलाला 7 कोटींसाठी विचारण्यात आला होता हा प्रश्न

KBC13 मध्ये हिमानी बुंदेलाला 7 कोटींसाठी विचारण्यात आला होता हा प्रश्न

मंगळवारच्या भागात रोलओव्हर स्पर्धक (Rollover Contestant) म्हणून हिमानी हॉटसीटवर बसल्या होत्या.

मंगळवारच्या भागात रोलओव्हर स्पर्धक (Rollover Contestant) म्हणून हिमानी हॉटसीटवर बसल्या होत्या.

मंगळवारच्या भागात रोलओव्हर स्पर्धक (Rollover Contestant) म्हणून हिमानी हॉटसीटवर बसल्या होत्या.

मुंबई, 1 सप्टेंबर– सामान्य माणूस स्वप्न पाहत असतो लक्षावधी रुपये कमवण्याची. तशी संधी त्याला क्वचितच आणि जीवनात कदाचित एकदाच मिळते. ती तो साध्य करू शकला तर तो होतो करोडपती. अशीच एक संधी सोनी एंटरटेनमेंट चॅनेलने (Sony Entertainment Channel) आपल्या ‘कौन बनेगा करोडपती’ या गेम शोच्या माध्यमातून अनेकदा सामन्य माणसांना  उपलब्ध करून दिली आहे. या गेम शोचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्याचे सादरकर्ते महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan). बच्चन यांच्या सादरीकरणामुळे या गेम शोची अनेक पर्व लोकप्रिय झाली आहेत. आता या शोचं 13 वं पर्व(Kaun Banega Crorepati 13) नुकतंच सुरू झालं आहे आणि त्यातला पहिला करोडपती स्पर्धक मंगळवारी (31 ऑगस्ट 2021) प्रसारित झालेल्या कार्यक्रमात मिळाला. या स्पर्धकाचं नाव आहे हिमानी बुंदेला (Himani Bundela). हिमानी या अंध आहेत. त्या सात कोटी रुपयांच्या बक्षिसापर्यंत पोहोचल्या होत्या पण त्यांना ते उत्तर बरोबर माहीत नसल्याने त्यांनी गेममधून माघार घेतली.

जाणून घेऊया हिमानी यांचा केबीसी13 मध्ये कसा झाला प्रवास.

मंगळवारच्या भागात रोलओव्हर स्पर्धक (Rollover Contestant) म्हणून हिमानी हॉटसीटवर बसल्या होत्या. त्यांनी एकामागे एक 14 प्रश्नांची उत्तरं दिली आणि त्या 1 करोड रुपयांचं बक्षीस मिळवून देणाऱ्या 15 व्या प्रश्नापर्यंत पोहोचल्या. त्यांनी प्रचंड आत्मविश्वासाने या प्रश्नाचं उत्तर दिलं आणि 1 कोटी रुपयांचं बक्षीस जिंकलं. अमिताभ यांनीही प्रचंड उत्साहात हिमानी यांचं अभिनंदन केलं.

(हे वाचा: मुलीच्या इंटीमेट सीनबद्दल आई श्वेता तिवारीची अशी आहे प्रतिक्रिया )

त्यानंतर होतो केबीसी 13 (KBC 13) मधला 7 कोटी रुपये जिंकण्यासाठीचा 16 वा प्रश्न. इथं हिमानी यांना लाइलाइन वापरता येणार नव्हती. या प्रश्नांचं उत्तर माहीत नसल्याने हिमानी यांनी खेळातून माघार घेण्याचा निर्णय घेतला. त्यांनी एक उत्तर दिलं पण ते चुकलं त्यामुळे बरं झालं त्यांनी माघार घेतल्यानंतर ते उत्तर दिलं. नाहीतर त्यांना एक कोटी रुपयांचं बक्षीसही नसतं मिळालं. पण समजुतदारपणे त्यांनी माघार घेतली.

(हे वाचा:  तिहार जेलमधील कैद्यानं कसं अडकवलं जॅकलीनला; जाणून घ्या सत्य)

हिमानी यांना 7 कोटी रुपयांसाठी विचारण्यात आला होता हा प्रश्न-

प्रश्न: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 1923 मध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून डॉक्टेरेट मिळवली होती. त्या वेळी त्यांनी सादर केलेल्या प्रबंधाचं शीर्षक काय होतं?

A. द वांट्स अँड मीन्स ऑफ इंडिया

B. द प्रॉब्लेम ऑफ द रूपी

C. नॅशनल डिविडंड ऑफ इंडिया

D. द लॉ अँड लॉयर्स

बरोबर उत्तर : ऑप्शन ‘B’ म्हणजे‘द प्रॉब्लेम ऑफ द रूपी.’

या शोमध्ये 15 प्रश्नांची उत्तरं देणं पण खूप कठीण असतं पण हिमानी यांनी अंध असूनही या खेळाचा खूप आनंद लुटला आणि त्या केबीसी 13 च्या पहिल्या करोडपती स्पर्धक ठरल्या.

First published:

Tags: Entertainment, Tv shows