मुंबई, 1 सप्टेंबर- बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसच्या (Jacqueline Fernandez) मनी लॉन्ड्रिंग**(Money Laundring Case)** प्रकरणात आत्ता एक मोठा नवा खुलासा झाला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, कॉनमॅन सुकेश चंद्रशेखर तिहाड जेलमधूनच जॅकलीन फर्नांडिसला फोन करत होता. मिळालेल्या माहितीनुसार, सुकेश चंद्रशेखर तिहाड जेलमधून स्कूपिंगद्वारा अभिनेत्रीला फोन करत होता. तुम्हाला सांगू इच्छितो, की EDने ज्या 200 कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अभिनेत्रीची चौकशी केली होती. याच प्रकरणाची ती बळी आहे. असं म्हटलं जात आहे, की सुकेशने जॅकलीनसोबत संवाद साधताना आपली ओळख लपवली होती. तो एका वेगळ्या नावाने तिच्याशी संवाद साधत होता. सुकेश स्वतःला खुपचं मोठी असामी भासवून या अभिनेत्रीशी बोलत होता. जेव्हा जॅकलीन त्याच्या जाळ्यात येऊ लागली तेव्हा तो तिला महागडे चॉकलेट आणि फुलं पाठवत असे. मात्र जॅकलीनला थोडासादेखील अंदाज नव्हता की हे सर्व तिहाड जेलमधील एक कैदी करत आहे. (हे वाचा: श्रद्धा कपूर ते विराट कोहली एका Insta पोस्टमधून मिळवतात कोट्यावधी रुपये ) तपास शाखेला सुकेशचे 2 डझनापेक्षा जास्त फोन कॉल्स हाती लागले आहेत. त्याचआधारे जॅकलीनसोबत फसवणूक झाल्याचं तपास शाखेच्या लक्षात आलं आहे. सुरक्षा कारणांमुळे या प्रकरणाबद्दल अजून कोणतीही सविस्तर खुलासे करण्यात आलेले नाहीत. इतकचं नव्हे तर अजून एका अभिनेत्रीला सुकेशने तिहाड जेलमधून स्कूपिंगद्वारे कॉल करत आपला निशाना बनवला आहे. सुकेशच्या रिमांडमध्ये वाढ- जेलमधून 200 कोटींचा घोटाळा करणाऱ्या सुकेशच्या रिमांडमध्ये वाढ करण्यात आली आहे. EWOला सुकेशची अजून 4 दिवसांची रिमांड मिळाली आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडून सुकेशच्या कथित पत्नी लीना पॉलचीदेखील चौकशी केली जाणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.